मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण? आणि जगात फक्त एकाच देशात मुंग्या नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 10:45 IST
1 / 7जगात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक सजीव गोष्टीला एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात मुंग्यांचाही वाटा आहे. 2 / 7मुंग्या नेहमी एका सरळ रांगेत चालतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात.3 / 7मुंग्यांना आपण एक सामाजिक प्राणी देखील म्हणून शकतो कारण त्या सर्व ठिकाणी आढळतात. त्या समूहानं वास्तव्य करतात. यात एक राणी मुंगी, नर मुंगी आणि बहुतेक मादा मुंग्या असतात. पंख असलेल्या मुंग्या या नर मुंग्या असतात. तर पंख नसलेल्या मुंग्या या मादा मुंग्या असतात. 4 / 7मुंग्यांना डोळे असतात हे खरं आहे. पण ते फक्त शोभेसाठी असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अन्नाच्या शोधात जेव्हा मुंग्या बाहेर पडतात तेव्हा त्यांची राणी मुंगी रस्त्यात फोरोमॉन्स नावाचं द्रव्य टाकत जाते. या द्रव्याचाच गंध घेत इतर मुंग्या तिचा पाठलाग करतात आणि त्यामुळेच त्या आपल्याला एका रांगेत चालताना दिसतात. 5 / 7जगात फक्त अंटार्टिका सोडून इतर सर्व देशांमध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यात मुंग्या आढळतात.6 / 7जगातील सर्वात विषारी मुंग्या ब्राझीलमध्ये सापडतात. ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलात या विषारी मुंग्या आढतात की ज्यांच्या एका डंखानं असह्य वेदाना होतात. 7 / 7किटकांच्या यादीत सर्वाधिक आयुर्मान असलेल्यांमध्ये मुंगी या किटकाचा समावेश होतो. जगात काही असे किटक आहेत की जे फक्त काही दिवस जगतात. तर दुसरीकडे मुंगीची एक 'पोगोनॉमिमेक्स ऑही' नावाची एक अनोखी प्रजात आहे की या प्रजातीची राणी मुंगी तब्बल ३० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकते.