शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

साबण रंगीत पण त्याचा फेस मात्र पांढरा, असे का? सुगंध तर तोच येतो, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:18 IST

1 / 10
आपण अंघोळ, कपडे, भांडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा साबण वापरतो. या सगळ्या साबणाचा रंग वेगळा असतो. एवढेच काय तर अंघोळीचे साबण देखील वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वासाचे येतात.
2 / 10
परंतु जेव्हा आपण त्याचा वापर करतो, तेव्हा त्यातून येणारा फेस हा मात्र पांढऱ्या रंगाचा असतो. मग असं का होतं?
3 / 10
विज्ञान म्हणते की कोणत्याही गोष्टीचा स्वतःचा रंग नसतो, वस्तूंचे रंग दिसण्याचे कारण प्रकाश किरण आहे. जर एखादी गोष्ट सर्व प्रकाशकिरण शोषून घेते तर ती काळी दिसते. त्याच वेळी, जेव्हा ते प्रकाशाच्या सर्व किरणांना परावर्तित करते, तेव्हा वस्तू पांढरी दिसते.
4 / 10
फोमच्या बाबतीतही असेच घडते. याशिवाय साबणात वापरण्यात येणारा रंगही फारसा प्रभावी नसतो.
5 / 10
अथेन्स सायन्सच्या अहवालानुसार, साबणाचा रंग कोणताही असो, जेव्हा त्याचा फेस तयार होतो तेव्हा त्यात पाणी, हवा आणि साबण असतो. हे गोल आकाराचे असतात आणि बुडबुड्याच्या स्वरूपात दिसतात.
6 / 10
जेव्हा प्रकाशकिरण त्यांच्यावर पडतात तेव्हा ते परावर्तित होतात. असे झाल्यावर हे पारदर्शक बुडबुडे पांढरे दिसतात आणि साबणाच्या रंगाचा प्रभाव दिसत नाही असे सर्वांना वाटते.
7 / 10
विज्ञान सांगते की, साबणाच्या स्कमपासून तयार होणारे लहान फुगे पारदर्शक असतात, यामुळेच प्रकाशाचे किरण त्यांच्यावर पडला की सर्व रंग परावर्तित होतात. विज्ञानानुसार असे झाल्यावर ती वस्तू पांढरी दिसते. यामुळे साबण हिरवा किंवा पिवळा असला तरी फेस पांढरा दिसतो.
8 / 10
हाच नियम समुद्र आणि नद्यांनाही लागू होतो. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, महासागर निळ्या रंगात रंगलेला दिसतो, पण जवळ जाऊन पाण्याकडे पाहिल्यावर त्याचा रंग निळा नसतो. वास्तविक, पाण्यात सूर्यकिरण शोषून घेण्याची ताकद असते.
9 / 10
दिवसा जेव्हा सूर्याची किरणे पाण्यावर पडतात, तेव्हा प्रकाशातून निघणारी इतर रंगांची किरणे पाणी शोषून घेते, ज्यामुळे निळा किरण परावर्तित करतो. प्रकाशाच्या या परावर्तनामुळे समुद्राचा रंग निळा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो निळा नसतो.
10 / 10
हे तत्व साबणालाही लागू होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके