शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे नीता अंबानी यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आणि किती घेतो पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:32 IST

1 / 6
नीता अंबानी आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नी आहेत. त्यांचा फॅशन सेन्स कमाल आहे. प्रत्येत इव्हेंटमध्ये त्यांची स्टाइल स्टेटमेंट पाहून सगळेच अवाक् होत असतात. त्या जेव्हाही कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांचं मेकअपही त्यांच्या लूकनुसार असतं. नीता अंबानी यांचं मेकअप एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट करतो. चला जाणून घेऊ नीता अंबानीचा लूक परफेक्ट करणारा मेकअप आर्टिस्ट कोण आहे?
2 / 6
या मेकअप आर्टिस्टचं नाव आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींचं मेकअप केलं आहे. यात करिना कपूर, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींची नावे आहेत. मिकी कॉन्ट्रॅक्टर हे नीता अंबानी यांचे पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहेत.
3 / 6
नीता अंबानी यांना जेव्हा गरज असते, तेव्हा ते त्यांच्या सेवेत हजर होतात. त्यांनी अनेक इव्हेंट्समध्ये नीता अंबानी यांचं मेकअप केलं आहे. ज्यात त्या फारच सुंदर दिसतात. त्यासोबत ते नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि सून श्र्लोका अंबानी यांचंही मेकअप करतात.
4 / 6
मीडिया रिपोर्टनुसार, मिकी कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील इव्हेंट्ससाठी ७५ हजार रूपये आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन मेकअप करायचं असेल तर १ लाख रूपये घेतात. प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांनी त्यांना मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी प्रेरित केलं होतं त्यांनी सुरूवातीच्या काळात हेलन यांचा हेअर ड्रेसर म्हणून काम केलं होतं. त्यावेळी मिकी मुंबईतील फेमस टोकियो ब्यूटी पार्लरमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करत होते.
5 / 6
मिकी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो न हो’, ‘मोहब्बतें’, ‘माय नेम इज खान’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘डॉन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘गुड न्यूज’, ‘अंग्रेजी मीडियम’सारख्या सिनेमासाठी काम केलंय.
6 / 6
मिकी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो न हो’, ‘मोहब्बतें’, ‘माय नेम इज खान’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘डॉन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘गुड न्यूज’, ‘अंग्रेजी मीडियम’सारख्या सिनेमासाठी काम केलंय.
टॅग्स :nita ambaniनीता अंबानीbollywoodबॉलिवूडMakeup Tipsमेकअप टिप्स