शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना सुल्तान...ना शेख...ना राजा...मग कोण आहे बुर्ज खलिफाचा खरा मालक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:26 IST

1 / 7
Burj Khalifa Owner: जगातील सगळ्यात उंच इमातर बुर्ज खलिफा दुबईत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. या इमारतीची नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होत असते. कधी यातील फ्लॅट्सची किंमत तर कधी यावर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींची किंमत चर्चेत असते. मात्र, बुर्ज खलिफा इमारतीचा मालक कोण त्याची कधीच चर्चा होत नाही. इमारत दुबईत असल्यानं सगळ्यांना हेच वाटतं की, इमारतीचा मालक एकतर एखादा दुबईतील एखादा राजा, सुल्तान असेल नाही तर शेख असेल...पण असं काही नाहीये.
2 / 7
मुळात बुर्ज खलिफा ही इमारत दुबईतील प्रसिद्ध रिअल इस्सेट कंपनी इमार प्रॉपर्टीजनं विकसित केली आहे. या कंपनीचे संस्थापक आणि मालक मोहम्मद अली अलाब्बार आहेत. ते दुबईतील एक मोठे बिझनेसमन आणि रिअल इस्टेट टायकून आहेत. म्हणजे टेक्निकली बुर्ज खलिफा इमारत त्यांच्याच कंपनीची संपत्ती आहे.
3 / 7
बुर्ज खलिफा इमारतीचं निर्माण २००४ मध्ये सुरू झालं होतं. तर २०१० मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. याची उंची ८२८ मीटर म्हणजे २७१६.५ फूट आहे आणि यात एकूण १६३ मजले आहेत. या गगनचुंबी इमारतीमध्ये ५८ हाय-स्पीड लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. या इमारतीचा वरचा भाग ९५ किलोमीटर दूरूनही दिसतो.
4 / 7
बुर्ज खलिफा ही इमारत केवल आपल्या उंचीसाठीच नाही तर शानदार आणि आधुनिक सुविधांसाठीही ओळखली जाते. यात ३०४ लक्झरी हॉटेल रूम्स आणि ९०० हाय-एंड अपार्टमेंट्स आहेत. इतकंच नाही तर या इमारतीची बाहेरून सफाई करण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ लागतो. इमारतीच्या आत दुबई फाउंटेन आणि दुबई मॉलही आहेत.
5 / 7
या इमारतीमध्ये जगातील सगळ्यात महागडे अपार्टमेंट आहेत. दुबई शहराच्या इतर भागांपैकी या भागात प्रॉपर्टीची किंमत ७८.५ टक्क्यांनी जास्त आहे.
6 / 7
बुर्ज खलिफाच्या १५ अॅनिवर्सरी निमित्त जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये इथे मोठी भाडेवाढ झाली. इथे एक बेडरूम असलेल्या अपार्टमेंटचं भाडं २०१५-१६ मध्ये १.८ लाख दिरहम वार्षिक जवळपास ५० लाख रूपयांपर्यंत गेलं होतं. आताही तेवढंच भाडं घेतलं जात आहे.
7 / 7
बुर्ज खलिफामध्ये गुंतवणूक करणं एक फायदेशीर डील मानली जाते. रिपोर्टनुसार, या इमारतीमध्ये ८५ ते ९० टक्के अपार्टमेंट्स नेहमीच भरलेले असतात. भाड्यातून मिळणारं वार्षिक रिटर्न ५ ते ६ टक्के असतं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स