शरीरातील कोणत्या अवयवाला अजिबात येत नाही घाम? कधी लक्षच दिलं नसेल, आता पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:24 IST
1 / 7Sweat Glands in Body: शरीराचं तापमान वाढलं की, आपोआप घाम येतो. ही एक नॅचरल प्रोसेस असून याद्वारे शरीर स्वत:ला थंड ठेवत असतं. शरीराच्या वेगवेगळ्या भागात घाम येतो. पण असा भाग आहे, जिथे घाम कधीच येत नाही.2 / 7शरीरातून घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. त्यामुळेच आपण कधी लक्ष दिलं नसेल की, शरीरातील एक असाही भाग आहे, जिथे कधीच घाम येत नाही.3 / 7शरीराचं तापमान जेव्हा वाढतं, तेव्हा शरीरातून घाम निघतो. शरीरात सगळीकडे घाम येतो. घाम निघाल्यावर शरीराचं तापमान कमी सामान्य होतं.4 / 7आपल्या शरीरात अॅपोग्रीन नावाच्या ग्रंथी असतात, ज्यामुळे घाम तयार होतो. इथेच बॅक्टेरियाही तयार होतात आणि ज्यामुळे घामाची दुर्गंधी येते.5 / 7शरीरावर सगळीकडे घाम घेतो. पण एक असाही भाग आहे जिथे घाम येत नाही. कारण त्या भागात अॅपोग्रीन ग्रंथी म्हणजेच स्वेट ग्लॅंड नसतात. 6 / 7शरीरावरील हा भाग म्हणजे आपले सुंदर, मुलायम आणि गुलाबी ओठ. हा शरीरातील एकमेव असा भाग आहे, जिथे उन्हाळ्यातही घाम येत नाही.7 / 7ओठांवर घाम न येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे स्वेट ग्लॅंड नसतात. याच कारणामुळे हिवाळ्यात ओठ फाटतात आणि उलतात.