शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बाबो! उंदराची ही प्रजाती हत्तीला कानाबाबत देते मात, वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 12:07 IST

1 / 10
कुणालाही विचारलं की, सर्वात मोठे कान असलेला प्राणी कोणता आहे? तर सगळेच उत्तर देतील हत्ती. जमिनीवर असलेल्या जीवांपैकी सर्वात मोठे काम हत्तीचे असतात. पण हे खरं नाहीय. जर शरीराच्या तुलनेत कान मोजले तर उंदराच्या एका प्रजातीच्या कानाचा आकार हत्तीलाही याबाबतीत मागे सोडते. चला जाणून या उंदरासारख्या जीवाचे कान इतके मोठे कसे आहेत आणि ते हत्ती व वाघाला कशी टक्कर देतात.
2 / 10
न्यूयॉर्क सिटीतील अमेरिकन म्यूझिअम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीच्या तज्ज्ञ मेरी एलेन होल्डेन म्हणाल्या की, हे बरोबर आहे की, आफ्रिकन हत्तीचे कान जगातल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा मोठे आहेत. पण जेव्हा विषय शरीराच्या आकाराने कान मोठे असण्याचा येतो तेव्हा एक छोटासा उंदीर बाजी मारतो.
3 / 10
मेरी एलेन होल्डन यांनी सांगितले की, या उंदरासारख्या जीवाचं नाव आहे लॉन्ग ईअर्ड जर्बोआ. हा रात्री फिरणारा आणि कीटक खाणारा जीव आहे. हा उंदराच्या प्रजातीशी संबंधित जीव आहे. सामान्यपणे हा जीव चीन आणि मंगोलियात आढळतो.
4 / 10
लॉंग ईअर्ड जर्बोआची पूर्ण लांबी ४ इंच म्हणजे १० सेंटीमीटरच्य आसपास असते. यात शेपटीचा समावेश नसतो. तर याने कान १.५ ते २ इंच लांब असतात. म्हणजे आपल्या शरीराच्या तुलनेत यांचे कान ४० ते ५० टक्के लांब असतात.
5 / 10
मेरी एलेन होल्डेन यांनी सांगितले की, या जीवांच्या दुनियेत शरीराच्या आकाराच्या तुलनेत कान सर्वात मोठे असतात. तर आफ्रिकन हत्तीच्या कानाची सरासरी लांबी ४ फूटच्या आसपास असते. जी शरीराच्या तुलनेत केवळ १७ टक्के असते. आफ्रिकन हत्तीची लांबी २० ते २५ फूट असते.
6 / 10
२००७ मध्ये ज्यूओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे वैज्ञानिक जेव्हा मंगोलियाच्या गोबी वाळवंटात गेले होते तेव्हा त्यांनी रात्रीचं रेकॉर्डींगसाठी कॅमेरा लावला होता. या कॅमेरात लॉंग ईअर्ड जर्बोआचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड झाले.
7 / 10
आता प्रश्न असा उभा राहतो की या जीवांचे कान इतके लांब का असतात? उष्ण ठिकाणांवर राहणाऱ्या जीवांना गरमीपासून बचाव करण्यासाठी अशाप्रकारचे कान नैसर्गिकपणे मिळतात. यात जीवांमध्ये आफ्रिकन हत्ती फेन्नेक लोमटी आणि लॉंग ईअर्ड जर्बोआ यांचा समावेश आहे. मेरी म्हणाल्या की, हे जीव कानांच्या माध्यमातून गरमीत स्वत:ला थंड ठेवतात.
8 / 10
मेरी यांनी सांगितले की, यांचे कान मोठे आणि पातळ असतात. यात रक्ताच्या फारच बारीक नसा असतात. जेव्हा यातून रक्त वाहतं तेव्हा ते पूर्ण उष्णता या कानाच्या माध्यमातून बाहेर काढतात. याने या जीवांचं शरीर थंड राहतं. हत्तीही उन्हाळ्यात याच कारणाने कान अधिक हलवतात.
9 / 10
मेरी सांगतात की, जेव्हा या जीवांना अधिक गरमी लागते तेव्हा त्यांच्या कानातील रक्तवाहिन्या फसरतात. याने ते जास्त उष्णता बाहेर काढतात. जेव्हा रात्री थंडी असते तेव्हा नसा आकुंचन पावतात. जेणेकरून उष्णता शरीरात स्टोर रहावी आणि त्यांना थंडी वाजू नये.
10 / 10
त्या म्हणाल्या की, जास्तीत जास्त लोक याच्याशी सहमत असतील की, मोठे कान हे गरम वातावरण असलेल्या ठिकाणांशी संबंधित आहेत. जर आफ्रिकन आणि एशियन हत्ती बघितले तर आफ्रिकन हत्तीचे कान अधिक मोठे असतात. तर एशियन हत्तींचे लहान असतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सscienceविज्ञानJara hatkeजरा हटके