१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:28 IST
1 / 122 / 12आपण दररोज वापरत असलेल्या इंग्रजी किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरचा इतिहास अत्यंत रंजक आहे. आज आपण वर्ष १२ महिन्यांचे मानतो, पण प्राचीन रोमन काळात वर्ष केवळ १० महिन्यांचे आणि ३०४ दिवसांचे असायचे. या कॅलेंडरमध्ये बदल होऊन आजचे आधुनिक स्वरूप कसे प्राप्त झाले, याची माहिती अत्यंत रोचक आहे. 3 / 12आज आपण जे कॅलेंडर पाहतो, ते १५८२ मध्ये पोप ग्रेगरी १३ वे यांनी सुधारित केले, ज्याला आपण 'ग्रेगोरियन कॅलेंडर' म्हणून ओळखतो. परंतू, त्यापूर्वी रोमचा दुसरा राजा नूमा पोम्पिलियस याला १० महिन्यांचे हे कॅलेंडर निसर्गाच्या चक्राशी जुळत नसल्याचे जाणवले. त्याने वर्षाचे ३५५ दिवस पूर्ण करण्यासाठी कॅलेंडरच्या शेवटी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जोडले. पुढे ४५० ईसापूर्व मध्ये जानेवारीला वर्षाचा पहिला महिना बनवण्यात आले.4 / 12प्राचीन रोमचा पहिला राजा रोमुलस याने तयार केलेल्या कॅलेंडरची सुरुवात मार्च महिन्यापासून व्हायची आणि शेवट डिसेंबरमध्ये व्हायचा. विशेष म्हणजे, डिसेंबरनंतरचे ६१ दिवस (हिवाळ्याचा काळ) कोणत्याही महिन्यात मोजले जात नव्हते. हा काळ शेतीसाठी उपयुक्त नसल्याने त्या दिवसांना कोणतेही नाव दिले गेले नव्हते.5 / 12हे दिवस मोजलेच जात नसल्याचे पाहून रोमचा दुसरा राजा नूमा पोम्पिलियस याने ७१३ ईसापूर्व मध्ये कॅलेंडरमध्ये सुधारणा केली. त्याने हिवाळ्यातील 'अज्ञात' दिवसांना एकत्र करून जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन नवीन महिने जोडले. यामुळे वर्षाचे १२ महिने पूर्ण झाले.6 / 12जानेवारी :रोमन देव 'जेनस' याच्या नावावरून. जेनसला दोन चेहरे होते—एक भूतकाळाकडे पाहणारा आणि दुसरा भविष्याकडे.7 / 12फेब्रुवारी : लॅटिन शब्द 'फेब्रुअम' पासून, ज्याचा अर्थ 'शुद्धीकरण' असा होतो. हा महिना आत्मशुद्धीचा काळ मानला जायचा.8 / 12मार्च : युद्धाची देवता 'मार्स' (Mars) याच्या नावावरून. रोमन वर्षाची सुरुवात या महिन्यापासून व्हायची.9 / 12एप्रिल : लॅटिन शब्द 'एपेरायर' (Aperire) म्हणजे 'उघडणे'. वसंत ऋतूत फुले उमलतात, म्हणून हे नाव.10 / 12मे आणि जून : मे हा महिना 'माईया' देवीच्या नावावरून, तर जून हा 'जूनो' देवीच्या नावावरून पडला आहे.11 / 12जुलै आणि ऑगस्ट : हे महिने अनुक्रमे रोमन सम्राट जुलियस सीझर आणि ऑगस्टस सीझर यांच्या सन्मानार्थ नाव बदलून ठेवले गेले.12 / 12गंमत म्हणजे, सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या नावांचा अर्थ आजही लॅटिन आकड्यांशी संबंधित आहे, सप्टेंबर: सेप्टेम (७ वा महिना), ऑक्टोबर: ऑक्टो (८ वा महिना), नोव्हेंबर: नोव्हम (९ वा महिना), डिसेंबर: डेसम (१० वा महिना).