आश्चर्य! २५६ वर्ष जगलेल्या माणसाला होती २०० मुलं; एक दोन नाही तर २३ जणींशी केलं लग्न.....
By manali.bagul | Updated: February 28, 2021 18:36 IST
1 / 7जर तुम्हाला कोणी तुमच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट विचारलं तर तुम्ही चांगली जीवनशैली आणि तणावपूर्ण आयुष्याबाबत सांगाल. अनेकजण सिंगल राहा आणि दिर्घकाळ जगा असं सांगत लग्न न करण्याशी दीर्घायुष्याचा संबंध जोडतात. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील सगळ्यात वयस्कर माणसाचं वय २५६ वर्ष होतं. हा माणूस एकदा दोनदा नाही तर तब्बल २०० वेळा बाप बनला होता. याशिवाय या माणसाच्या २३ पत्न्या सुद्धा होत्या. आजही या माणसाचं नाव सगळ्यात जास्त जीवन जगलेल्या माणसांमध्ये आहे. 2 / 7२५६ वर्ष जगलेल्या या माणसाचं नाव ली चिंग होतं. ली यांचा जन्म चीनमध्ये झाला होता. ३ मे १६७७ मध्ये ली यांच्या जन्माच्या वेळी चीनमध्ये राजेशाही वर्चस्व होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं. त्यानंतर ते पर्वतांवर राहायला गेले. 3 / 7१३ वर्ष पर्वतांवर राहिल्यानंतर त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते सैन्यात रुजू झाले. जनरल यू जोंग यांच्या सेनेत सल्लागार म्हणून काम पाहात होते. 4 / 7७८ वर्षाच्या वयात यांनी निवृत्ती घेतली. सैन्यात योगदान दिल्यामुळे त्यांची राजघराण्यात वेगळी ओळख होती. शाही राजघराण्याला १००, १५० आणि २०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मेसेज पाठवला होता. हा संदेश १९२९ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापला होता. समोर आलेल्या कागदपत्रांनुसार ली यांचा मृत्यू ६ मे १९३३ मध्ये झाला होता. 5 / 7ली हे आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा होते. त्यांच्या औषधांनी अनेकांना गंभीर आजारांपासून आराम मिळायचा. 6 / 7त्यांची किर्ती दूरवर पसरली होती. त्यांना मार्शल आर्टसुद्धा येत होते. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ली यांनी २३ वेळा लग्न केलं असून २३ पत्न्यांचे अंतिम संस्कारही केले होते. २३ बायकांना एकून २०० मुलं होती. ते २०० वर्ष जगले होते. पण स्थानिक रिपोर्ट्सनुसार ते २५६ वर्ष जगले होते.7 / 7(Image Credit-asianetnews)