'या' देशाच्या सैनिकांना मिळतो १ कोटी रूपये पगार, पण कधीच युद्धात लढत नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:27 IST
1 / 8Swiss Guard Salary: जगातील सगळ्यात छोटा देश व्हॅटिकन सिटी इटलीची राजधानी रोम शहरात वसला आहे. इथे रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप राहतात. व्हॅटिकन सिटी फारच सुंदर आणि या शहराचे अनेक रोचक तथ्य आहे.2 / 8व्हॅटिकन सिटी जगातील सगळ्यात छोट्या देशांपैकी एक आहे. जवळपास १०० एकर परिसरात हा देश वसला आहे. तर या देशाचं नागरिकत्व एक हजारपेक्षाही कमी लोकांकडे आहे. तर लाखो पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात. 3 / 8जगातल्या सगळ्यात छोट्या देशांपैकी एक असलेल्या देशाची आर्मीही छोटीशी आहे. ज्यात १५० पेक्षा कमी सैनिक आहेत. या सैनिकांकडे पोपच्या सुरक्षेची जबाबदारी असते. 4 / 8स्विस गार्ड जगातल्या सगळ्यात जुन्या सैन्य कोरपैकी एक आहे. स्विस गार्ड बनण्यासाठी काही आवश्यक योग्यता असणं गरजेचं असतं. स्विस गार्ड स्विस आणि कॅथलिक असणं गरजेचं आहे. या आर्मीमध्ये केवळ पुरूषांना घेतलं जातं. ते अविवाहित असणं गरजेचे असतात. सोबतच त्याचं वय १९ वर्ष ते ३० दरम्यान असावं. तर त्यांच उंची ५.८ असावी.5 / 8व्हॅटिनक सिटी आणि पोपची सुरक्षा करणारी ही आर्मी तशी तर कधी युद्धावर जात नाही. पण तरीही त्यांना पगार मात्र भरपूर मिळतो. या सैनिकांचा पगार €1,500 ते €3,600 म्हणजे महिन्याला साडे चार लाखांपर्यंत असतो. 6 / 8काही रिपोर्ट्सनुसार, स्विस गार्डच्या सैनिकांना १३ महिन्यांचा पगार दिला जातो. सोबतच त्यांना अनेक सुविधाही दिल्या जातात. जसे की, रहायला घर, दरवर्षी ३० दिवसांची सुट्टी. पगार आणि सोयी-सुविधांचा खर्च पकडला तर त्यांना वार्षिक १ कोटी रूपये मिळतात.7 / 8स्विस गार्डच्या या सैनिकांना दरवर्षी ६ मे रोजी शपथ दिली जाते आणि पोपची सेवा करण्यासाठी दोन वर्षाच्या कॉन्ट्र्रॅक्टवर हस्ताक्षर करावं लागतं. 8 / 8स्विस गार्डच्या या सैनिकांना दरवर्षी ६ मे रोजी शपथ दिली जाते आणि पोपची सेवा करण्यासाठी दोन वर्षाच्या कॉन्ट्र्रॅक्टवर हस्ताक्षर करावं लागतं.