शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्लॅस्टिक सर्जरीमुळे माणूस एलियन होऊ शकतो का? अमेरिकेच्या प्लॅस्टिक सर्जनचं धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:33 IST

1 / 10
जगभरात प्लॅस्टिक सर्जरी करून आपला चेहरा बदलण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एका ब्रिटिश व्यक्तीने कोरियातील माणसांप्रमाणे दिसण्यासाठी सर्जरी केली त्यामुळे त्याचा चेहरा आणखीनच विद्रुप दिसू लागला.
2 / 10
हॉलीवुडचे प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन स्टीवन हॅरिस यांनी असा इशारा दिला आहे की, विचित्र कॉस्मेटिक सर्जरींमुळे अशी माणसं एखाद्या एलियन्सप्रमाणे दिसू लागतील. इतकेच नव्हे तर नव्या एलियन्सची जातच जन्माला येईल.
3 / 10
हॅरिस यांनी असंही सांगितलं की अशा कॉस्मेटिक्स सर्जरींमुळे मानसिक रोगही वाढत आहेत. ते म्हणाले, या अशाप्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरीमध्ये रशियन लिप्स (Russian Lips)) नावाची एक प्रक्रिया असते. ती केल्यानंतर माणसं खरंच एलियन्ससारखी दिसू लागतात.
4 / 10
हॅरिसने सांगितलं की इतरांसारखे सुंदर दिसण्यासाठी काहीजण आपले चिकबोन व भुवयाही बदलतात.
5 / 10
हॅरिस यांनी एका महिलेचे उदाहरण दिले जिने अँजलिना जोली प्रमाणे दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केली व ती आता एलियन्ससारखीच दिसते.
6 / 10
हॅरिस यांनी समाजात विकृत सौंदर्याची परिभाषा निर्माण होण्याच्या परिस्थीतीला सोशल मिडियाला जबाबदार धरले (Alienisation and Objectification).
7 / 10
हॅरिस यांनी सांगितलं की अनेक प्लॅस्टिक सर्जन फक्त पैशाच्या मोहापायी अशाप्रकारच्या विचित्र सर्जरीस करतात पण ती सर्जरी करणाऱ्या व्यक्तीला यामुळे मोठा शारिरक मानसिक त्रास सहन करावा लागतो
8 / 10
हॅरिस यांनी सांगितलं की, चेहऱ्यावरील एखादं फिचर बदलण्यासाठी त्यावर बरचं काम करावं लागतं. कोणत्याही कॉस्मेटिक सर्जनने फक्त पैशासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळु नये.
9 / 10
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की कॉस्मेटिक सर्जरीमुळे माणसं एलियन्स बनू शकतात का? तर त्यावर ते म्हणाले की 'एलियनाइजेशन' हा एक शब्द आहे. ज्याचा अर्थ असा होतो की माणसापेक्षा वेगळे फिचर्स असणे
10 / 10
तसेच यामध्ये माणसं नेहमीपेक्षा वेगळी दिसतात म्हणून ती एलियन्ससारखी दिसतात असं म्हटलं जातं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके