शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातल्या सर्वात जुन्या वाळवंटाचं हैराण करणारं रहस्य, जे आजही उलगडलं गेलेलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:58 IST

1 / 7
जगभरातील वेगवेगळ्या वाळवंटांची चर्चा नेहमीच होत असते. त्यांच्या रहस्यांनी लोक चकित होत असतात. असाच एक वाळवंट नामीब वाळवंट. या वाळवंटात गोलाकार आकृतींचं रहस्य मात्र आजपर्यंत कुणी उलगडू शकलं नाही. बरं या वाळवंटाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही आहेत.
2 / 7
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, दक्षिण-पश्चिम आफ्रिकेच्या अटलांटीक किनाऱ्याला लागून असलेला नामीब वाळवंट जगातल्या सर्वात कोरड्या जागांपैकी एक आहे. स्थानिक भाषेत याचा अर्थ होतो, 'एक असा परिसर जिथे काहीच नाही'. मंगळ ग्रहाच्या जमिनीसारख्या दिसणाऱ्या या वाळवंटात वाळूचे डीग, डोंगर आहेत. हा वाळवंट तीन देशांमध्ये पसरलेला आहे.
3 / 7
पाच कोटी ५० लाख वर्ष जुन्या नामीब वाळवंटाला जगातला सर्वात जुना वाळवंट मानलं जातं. सहारा वाळवंट केवळ २० ते ७० लाख वर्ष जुना आहे. उन्हाळ्यात येथील तापमान फार वाढतं तर रात्री भयंकर थंडी पडते. त्यामुळे वस्तीसाठी हे फारच दुर्गम ठिकाण आहे. तरीही काही प्रजातींनी इथे आपलं घर केलं आहे.
4 / 7
नामीब वाळवंट दक्षिण अंगोला ते नामीबियापासून २ हजार किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर भागात पसरलेला आहे. नामीबियाच्या लांब अटलांटीक तटावर हा वाळवंट नाटकीय रूपाने समुद्राशी मिळतो. नामीब वाळवंटाच्या सर्वात कोरड्या भागात वर्षात केवळ दोन मिलीमीटर पाऊस पडतो. अनेक वर्ष तर पाऊसच पडत नाही. तरी सुद्धा वेगवेगळे प्राणी येथील परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतात.
5 / 7
नामीब वाळवंटातील सर्वात धोकादायक परिसर हा वाळूच्या डोंगरांनी, तुटलेल्या जहाजांनी भरलेला आहे. अटलांटीक तटावर ५०० किलोमीटर लांब परिसरात पसरलेला हा भाग कंकाल तट म्हणून ओळखला जातो. कारण इथे व्हेलचे कित्येक सांगाडे, १ हजार जहाजांचा मलबा पडलेला आहे.
6 / 7
१४८६ मध्ये आफ्रिकेत पश्चिम तटाच्या किनाऱ्यावरून जात असताना पोर्तुगालच्या प्रसिद्ध डियागो काओ हा नावीक सांगाडे पाहून काही वेळासाठी थांबला होता. काओ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिथे क्रॉस तयार केला. पण ते जास्त वेळ तिथे थांबू शकले नाही. त्याने नंतर या ठिकाणाला 'नरकाचा दरवाजा' असं नाव दिलं.
7 / 7
या वाळवंटातील वाळूचा रंग केशरी आहे. हा रंग मुळात जंग लागल्याचा आहे. कारण येथील वाळूमध्ये लोखंडाची प्रमाण अधिक आहे. येथील आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे येथील जमिनीवरील गोलाकार आकृती. अशा लाखो आकृती आहेत. अनेक दशकांपासून या आकृतींनी वैज्ञानिकांना हैराण केलं आहे. तर स्थानिक लोक म्हणतात की, या आकृती देवाने तयार केल्या आहेत. हे त्यांची देवता मुकुरूच्या पायांचे निशान आहेत. वैज्ञानिकांनी सांगितले की, या आकृती वेगवेगळ्या कारणांनी तयार होतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके