शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुप्त मार्ग आणि रहस्यांनी भरला आहे गोलकोंडा किल्ला, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 6:30 PM

1 / 8
भारताचा इतिहास राजे-महाराजांनी तयार केलेल्या शानदार किल्ल्यांनी भरलेला आहे. यात अशाही किल्ल्यांचा समावेश आहे जे डोंगरावर किंवा उंच ठिकाणावर बनवले गेले होते. जेणेकरून युद्धावेळी राजपरिवाराची सुरक्षा करता यावी. यात किल्ल्यांमध्ये एक नाव गोलकोंडा किल्ल्याचंही येतं. चला जाणून घेऊ या किल्ल्याची खासियत आणि यातील रहस्य....(All Image Credit : Social Media)
2 / 8
हा ऐतिहासिक किल्ला हैद्राबादच्या पश्चिम भागात हुसैन सागर सरोवरापासून जवळपास ९ किमी अंतरावर आहे. तेलंगाणा टूरिज्मच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या किल्ल्यांचं निर्माण ११४३ मध्ये डोंगरावर करण्यात आलं होतं. या किल्ल्याला आधी Mankal नावाने ओळखलं जात होतं.
3 / 8
हा सुरूवातील एक मातीचा किल्ला होता. १४व्या आणि १७व्या शतकात किल्ल्यांची पुन्हा बांधणी करण्यात आली. रिपोर्टनुसार, या किल्ल्यांचा इतिहास १३व्या शतकातील आहे. तेव्हा इथे काकतीय राजांचं शासन होतं. त्यानंतर हा किल्ला कुतुबशाहीच्या राजांच्या ताब्यात गेला. गोलकोंडा कुतुबशाहीची राजधानी बनला.
4 / 8
असं मानलं जातं की, जिथे आज गोलकोंडा किल्ला उभा आहे तिथे एका गुरे चारणाऱ्या व्यक्तीला एक मूर्ती सापडली होती. त्याने ती मूर्ती काकतीय राजाकडे नेली. राजाने हे स्थान पवित्र असल्याचं मानत इथे किल्ला उभारला. याला गोलकोंडा किल्ला म्हणतात. त्यानंतर बहमनी आणि नंतर कुतुबशाही राजांनी यावर ताबा मिळवला.
5 / 8
असंही मानलं जातं की, जर कुणी किल्ल्याच्या खालून टाळी वाजवली तर त्याचा आवाज एक किमी दूर बाला हिसार गेटवर ऐकायला मिळतो. या ठिकाणाला तालिया मंडप म्हणतात. त्यासोबतच किल्ल्यात आठ दरवाजे, चार ड्रॉब्रिज, मशीद, तोफ, शाही रूम्स बघू शकता. बाला हिसार गेट येथील मुख्य द्वार आहे.
6 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, या किल्ल्यात सुरक्षा लक्षात घेऊन एक भुयारही तयार करण्यात आला होता. हा किल्ल्याच्या तळातून किल्ल्याच्या बाहेर निघत होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे या भुयारी मार्गाबाबत इतिहासकारांन जास्त माहिती मिळू शकली नाही.
7 / 8
एका मीडिया रिपोर्टनुसार, गोलकुंडातून एक भुयारी मार्ग चारमीनारला जातो आणि यात गुप्त खजिना असल्याचंही म्हटलं जातं. पण अजूनपर्यंत या खजिन्याबाबत काही समजलं नाही. असंही मानलं जातं की, हा भुयारी मार्ग सुल्तान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी केलं असेल, जेणेकरून युद्ध काळात राज परिवाराची सुरक्षा करता यावी.
8 / 8
गोलकोंडा हे ठिकाण आपल्या हिऱ्याच्या खाणीसाठीही ओळखलं जातं. जगप्रसिद्ध बहुमूल्य कोहिनूर हिरा येथूनच काढण्यात आला होता. बीबीसीनुसार, गोलकोंडाच्या खाणीतून काढलेल्या एका हिऱ्याला लिलावात ११५ कोटी रूपये किंमत मिळाली होती.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेFortगड