Tokyo Olympic : जर्मन महिला जिम्नॅस्ट्स वेधुन घेतायत सर्व जगाचे लक्ष, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 18:50 IST
1 / 10टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्व खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत पण यामध्ये जर्मन महिला जिम्नॅस्टिक्सने जे केलं ते जगाचं लक्ष वेधुन घेत आहे.2 / 10जर्मन महिला खेळाडूंनी खेळाद्वारे 'फ्रीडम ऑफ चॉईस' म्हणजे 'आपल्या पसंतीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य' याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.3 / 10रविवारी झालेल्या सामान्यात जर्मनीच्या जिमॅन्स्टिक्स फुल बॉडी सुटमध्ये दिसल्या. त्यांचे म्हणने हे 'फ्रीडम ऑफ चॉईस' च्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याच्या हेतून डिझाईन केले आहेत. या कपड्यांमध्ये महिला खेळाडू अगदी सहज वावरु शकतात.4 / 10टीममधील खेळाडू सारा वॉस, पॉलीन शेफर- बेट्ज, एलिझाबेथ सेट्ज आणि किम बुई या लाल व सफेद रंगाचा युनिटार्ड ड्रेस घालून मैदानात उतरल्या.5 / 10हा ड्रेस लियोटार्ड आणि लेगिंग्जचा वापर करून बनवला होता.हे ड्रेस त्यांच्या पायांना संपूर्ण कव्हर करत होते.6 / 10हा ड्रेस लियोटार्ड आणि लेगिंग्जचा वापर करून बनवला होता.हे ड्रेस त्यांच्या पायांना संपूर्ण कव्हर करत होते.7 / 10या टीमने ट्रेनिंगदरम्यानही असेच कपडे घातले होते.8 / 10२१ वर्षाच्या वॉसने म्हटले की, जशा तुम्ही स्त्री म्हणून मोठ्या होत जाता तश्या तुम्हाला तुमच्या शरीरासह सहज वावरणं कठीण होत जातं.9 / 10ती पुढे म्हणाली, की आम्हाला अनुभवायचे होते की आम्ही सुंदर दिसण्यासोबतच सहज वावरु शकू असे कपडे घालावेत. मग तो शॉर्ट युनिटार्ड असो किंवा लाँग10 / 10जर्मन खेळाडूंच्या या कृतीचं सर्व जगातून कौतुक केलं जातंय.