शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाल चंदन नाही तर 'हे' आहे जगातील सगळ्यात महाग लाकूड, किंमत वाचून उडेल झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:43 IST

1 / 7
African Blackwood : पुष्पा सिनेमा आल्यापासून सगळ्यांना वाटतं लाल चंदानाचं लाकूड जगात सगळ्यात महाग आहे. पण असं नाहीये.
2 / 7
जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, जगात असंही लाकूड आहे जे सोन्यापेक्षाही जास्त किंमतीत विकलं जातं तर हैराण व्हाल.
3 / 7
जगातील सगळ्यात महाग लाकूड आफ्रिकन ब्लॅकवुड आहे. हे दुर्मीळ लाकूड मध्य आणि दक्षिण आफ्रिकेसोबत इतरही काही देशांमध्ये आढळतं.
4 / 7
या लाकडाच्या एक किलोला ८ हजार पाउंड म्हणजे ७ लाख रूपये किंमत मिळते. म्हणजे या लाकडाच्या एक किलोच्या किंमतीत तुम्ही कार खरेदी करू शकता.
5 / 7
हे झाड ठीकपणे तयार होण्याला ६० वर्षापर्यंतचा वेळ लागतो. यांची उंची जवळपास २५ ते ४० फूट असते. ही झाडे कोरड्या जागेवर जास्त असतात. हे झाड फार कमी प्रमाणात आहेत आणि डिमांड जास्त आहे. त्यामुळे त्यांची किंमत सतत वाढत आहे.
6 / 7
या लाकडाचा जास्त वापर शहनाई, बासरी आणि गिटारसारखी वाद्ये तयार करण्यासाठी केला जातो. तसेच यापासून मजबूत आणि टिकाऊ फर्नीचर तयार केलं जातं.
7 / 7
फार महागडं असल्याने आफ्रिकन ब्लॅकवुडचे दुश्मनही जास्त आहेत. तस्कर झाड व्यवस्थित वाढायच्या आतच तोडतात. हे झाड दुर्मीळ श्रेणीत येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केनिया, तंजानियासारख्या देशात या झाडांची तस्करी सामान्य आहे. जंगलात ही झाडे वाचवण्यासाठी सिक्युरिटी लावली आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल