देशातील एक असं शहर जिथे ना कुणी कांदे खातात, ना विकतात - ना शेती करतात; कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:23 IST
1 / 7भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या राज्यात किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. कुठे लोक काही मांसाहार करत नाहीत, तर कुठे लोक पूर्णपणे शाकाहारी असतात. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, भारतात एक असंही ठिकाण आहे, जिथे अजिबात कांदा खाल्ला जात नाही. 2 / 7सामान्यपणे भारतीय घरांमध्ये रोज कांद्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. कांदा हा रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कांद्याशिवाय भाजी बनवलीच जाऊ शकत नाही. पण जम्मू-काश्मीरमधील कटरा शहर हे याबाबत अपवाद आहे. कारण इथे कांदा पूर्णपणे बॅन आहे.3 / 7भारतीय घरांमध्ये डाळी, भाज्या, सलाद किंवा चटणी या गोष्टी बनवण्यासाठी कांद्यांचा वापर केला जातो. पण कटरा शहरात कांद्याची शेती, विक्री आणि वापर यावर बंदी आहे. 4 / 7आपल्याला आश्चर्य वाटेल की, इथे कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कांदा किंवा लसणाशिवाय बनलेले पदार्थ मिळतात. यामागचं कारण आहे धार्मिक मान्यता आहे. आपल्याला कल्पना असेल की, वैष्णो देवीची यात्रा इथूनच सुरू होते. त्यामुळे हे ठिकाण खूप पवित्र मानलं जातं. पवित्रता कायम ठेवण्यासाठी इथे कांदे आणि लसणावर बंदी आहे.5 / 7हिंदू धर्मानुसार, कांदा आणि लसणाला तामसिक भोजन मानलं गेलं आहे. तामसिक' म्हणजे तमोगुणाशी संबंधित, ज्यामध्ये अंधकार, अज्ञान, आळस, निष्क्रियता आणि विनाशकारी गुणधर्म येतात. पूजा-पाठ करताना या गोष्टी वर्ज असतात. कटरा हे शहर वैष्णो देवीचं मुख्य प्रवेश द्वार आहे. इथे सात्विक वातावरण ठेवणं गरजेचं आहे असं म्हणतात. याच कारणानं इथे कांदा आणि लसणावर बंदी आहे.6 / 7महत्वाची बाब म्हणजे कांद्यासंबंधी इथे कोणताही व्यापार होत नाही. कांद्याची विक्री होत नाही आणि दुकानावरही मिळत नाहीत. हॉटेल, धाब्यांवरही मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, येथील जेवण टेस्टी नसतं. येथील जेवण कांदा-लसणाशिवायही टेस्टी असं, अनेक लोक सांगतात.7 / 7ही परंपरा पार पाडण्यात स्थानिक लोक आणि प्रशासन दोन्हींकडून महत्वाची भूमिका बजावली जाते. नियमांचं पालन केलं जातं आणि स्थानिक लोकही याचा भाग असतात. काही दुकानदार सांगतात की, बाहेरून येणारे भाविक कांदा मागतात, पण आम्ही त्यांना सात्विक पर्याय सुचवतो.