ही आहे जगातील सर्वात महाग दारू, एका थेंबाची किंमत ऐकून बसेल धक्का, अशी आहेत वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:39 IST
1 / 6मानवाने तयार केलेल्या काही गोष्ट्यी ह्या अवााक् करणाऱ्या आहेत. त्यातीलच एक आहे ती म्हणजे जगातील सर्वात महाग दारू. जिचा एक थेंब खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला १०० वेळा विचार करावा लागेल. तसेच या दारूच्या एका बाटलीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 2 / 6जगातील सर्वात महागड्या दारूचं नाव आहे इसाबेला इस्ले व्हिस्की. याच्या ७५० मिलीच्या एका बाटलीची किंमत तब्बल ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाटलीतील दारूचा एक थेंब खरेदी करायचा झाल्यास ३३ हजार ३३३ रुपये मोजावे लागू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या दारूच्या बाटलीवर हिरे जडवलेले असतात.3 / 6जगातील दुसरी सर्वात महागडी दारू आहे ती म्हणजे बिलेनियर व्होडका. याच्या बाटलीवरही हिरे जडवलेले असतात. या दारूच्या एका बाटलीची किंमत २७.५ कोटी रुपये एवढी आहे. या दारूच्या प्रत्येक थेंबाची किंमत ही १८ हजार ३३३ रुपये एवढी आहे. 4 / 6या यादीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महाग दारू आहे ती म्हणजे Tequila Ley. या मद्याची एक बाटली तयार करण्यासाठी जवळपास १० महिन्यांचा वेळ लागतो. या बाटलीवर हिरे, सोनं आणि प्लॅटिनम जडवलेलं असतं. या मद्याच्या एका बाटलीची किंमत तब्बल २६ कोटी रुपये इतकी असते. त्या दृष्टीने पाहिल्यास या मद्याच्या एका थेंबाची किंमत १७ हजार ३३३ रुपये एवढी आहे. 5 / 6महागड्या दारूंपैकी एक असलेल्या Henry 4th ची एक बाटली खरेदी करणयासाठी तुम्हाला १५ कोटी रुपये मोजावे लागू शकतात. ही बाटली तयार करण्यासाठी २४ कॅरेट गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनमचा वापर केला जातो. याच्या किमतीचा विचार केल्यास एक थेंब मद्याची किंमत १० हजार रुपये एवढी भरते. 6 / 6या यादीमधील पाचवी सर्वात महागडी दारू आहे ती म्हणजे Vodka RussoBaltique. रशियामधील एका टीमने १९११ मध्ये तिची निर्मिती केली होती. या व्होडकाच्या एक बाटलीची किंमत १० कोटी रुपये एवढी आहे. हा जगातील दुसरा सगळ्यात महाग व्होडका आहे. किमतीचा विचार केल्यास याच्या एका थेंबासाठी तुम्हाला ६ हजार ६६६ रुपये मोजावे लागू शकतात.