दुबईत 'या' गोष्टी कराल तर पडेल भारी; घडेल तुरुंगवारी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 20:38 IST
1 / 5महिलांनी पुरुषांसारखे आणि पुरुषांनी महिलांसारखे कपडे परिधान केल्यास दुबईत तुरुंगवारी घडू शकते. कारण दुबईमध्ये रुढी परंपरा पाळल्या जातात. 2 / 5सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल किंवा जबर दंड भरावा लागेल. घरी किंवा बारमध्येच तुम्ही मद्यपान करु शकता.3 / 5तुमच्याकडे अंमली पदार्थ आढळून आल्यास आजन्म तुरुंगवास घडू शकतो. 4 / 5सार्वजनिक ठिकाणी मिठी मारल्यासही दुबईत तुरुंगाची हवा खावी लागू शकते.5 / 5सार्वजनिक ठिकाणी नाचण्यासही दुबईत बंदी आहे. असं केल्यास दंड आकारला जातो.