शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना मंदिर, मशिद, ना चर्चशी संबंध...'या' देशांमध्ये वेगानं वाढत आहे नास्तिकता, पाचवं नाव देईल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:12 IST

1 / 7
Largest Atheist Country: जगभरातील लोक वेगवेगळ्या धर्माला फॉलो करतात. सगळ्यांचे देवही वेगवेगळे असतात. एखाद्या संकटात सापडल्यावर सगळ्यांना आपापला देव आठवतो. बरेच लोक आपल्या धर्माबाबत खूप कट्टर असतात. पण असेही काही लोक आहेत ज्यांचा कोणत्याच धर्मावर विश्वास सनाही. ते कोणत्याही देवाला मानत नाहीत. ना मंदिरात जातात, ना मशिदीत. म्हणजे हे लोक धर्मनिरपेक्षता आणि नास्तिकतेकडे वळत आहेत. प्यू रिसर्च सेंटरच्या एका रिपोर्टमधून एक मोठा खुलासा झाला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, काही देश असे आहेत जिथे राहणारे जास्तीत जास्त लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत.
2 / 7
या यादीत सगळ्यात वर नाव येतं ते चीनचं. नास्तिक लोक जास्त असण्याबाबत चीन सगळ्यात मोठ्या देशांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, इथे ९१ टक्के लोक कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. कोणत्याही देवावर विश्वास ठेवत नाहीत. पण इथे ताओवाद आणि बौद्ध धर्माच्या पारंपारिक मान्यता फॉलो केल्या जातात.
3 / 7
चीननंतर दुसरा नंबर लागतो तो जपानचा. जपानमध्ये कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. जपानमध्ये बौद्ध धर्माबाबत धार्मिक परंपरा आहेत. पण इथे राहणारे ८६ टक्के लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत.
4 / 7
या यादीत स्वीडनचा देखील समावेश आहे. इथे जास्तीत जास्त लोक स्वत:ला नास्तिक मानतात. इथे राहणारे ७८ टक्के लोक कोणताही धर्म मानत नाहीत. हा देश बऱ्याच वर्षांपासून धर्मनिरपेक्ष राष्ट्र मानला जातो.
5 / 7
चेक गणराज्यामध्ये राहणारे सुद्धा जास्तीत जास्त लोक नास्तिक आहेत. म्हणजे येथील मोठी लोकसंख्या कोणताही धर्म मानत नाहीत. इथे जवळपास ७५ टक्के लोक नास्तिक आहेत. असं म्हटलं जातं की, या देशात साम्यवाद होता आणि त्यामुळे इथे धर्माचं दमन करण्यात आलं.
6 / 7
पुढे या यादीत ब्रिटनचं नाव आहे. जे धक्का देणारं आहे. ब्रिटनमधील जास्तीत जास्त लोक एकेकाळी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होते. पण आता हळूहळू या देशातील लोक नास्तिक बनत आहेत. आता इथे राहणारे ७२ टक्के लोक कोणताही धर्म मानत नाहीत.
7 / 7
धर्मनिरपेक्ष देशांच्या या यादीत एस्टोनिया सुद्धा आहे. येथील ७२ टक्के लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. म्हणजे ते सगळे नास्तिक आहेत. असं म्हटलं जातं की, जेव्हा इथे सोव्हिएत शासन होतं, तेव्हा इथे धर्माला खूप दाबण्यात आलं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय