शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Woman stumbles upon whale vomit : समुद्र किनारी फिरताना पायाला लागला अनोखा दगड; अन् ती रातोरात करोडपती झाली ना राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:10 IST

1 / 7
कोणाचं नशीब कधी बदलेल काहीही चांगता येत नाही. असंच काहीसं घडलंय थायलँडच्या महिलेसह. ही महीला समुद्र किनारी फिरायला निघाती तेव्हा तिच्या पायाला एक अनोखा दगड लागला. हा दगड पाहून ही महिला चकीत झाली.
2 / 7
तिनं विचारही केला नव्हता हा दगड एव्हढा मौल्यवान असेल. या दगडाच्या तुकड्यानं महिलेला रातोरात करोडपती बनवलं आहे.
3 / 7
थायलँडच्या महिलेला मिळालेला दगड हा साधासुधा नसून व्हेल माश्याच्या उलटीचा आहे. असं सांगितलं जातं की, व्हेल मासा अनेक वर्षांनंतर अशी उलटी करतो. या ऊलटीपासून अनेक सुंगंधित द्रव्ये तयार केली जातात. जेव्हा तिला या दगडाबाबत खरी माहिती मिळाली तेव्हा महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला.
4 / 7
२३ वर्षीय दक्षिणी थायलँडच्या नखोनमधील रहिवासी असलेली थरम्मद प्रांतात राहणारी रिरिपॉर्न नियामरिन बीचवर फिरत होती. याठिकाणी तिला एक वेगळाच तुकडा दिसून आला. जेव्हा तिनं हा दगड पाहिला त्याचक्षणी ती आकर्षित झाली.
5 / 7
या तुकड्याला माश्यासारखा वासही येत होता, म्हणून हा दगड ती आपल्या सोबत घरी घेऊन आली. जेव्हा आजूबाजूवाल्यांनी हा दगड पाहिला तेव्हा कळलं हा दगड व्हेल माश्याची ऊलटी आहे.
6 / 7
वैज्ञानिक भाषेत या दगडाला एम्बरग्रीस म्हणतात. या दगडाची किंमत १ लाख ५० पाऊंड आहे.
7 / 7
भारतीय चलनानुसार याची किंमत रुपये आहे. या महिलेचा विश्वासच बसत नाहीये की एका दगडानं त्यांना करोडपती बनवलं आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSea Routeसागरी महामार्ग