1 / 11वैज्ञानिकांनी सूर्याबाबत एक नवीन आणि चिंताजनक माहिती दिली आहे. वैज्ञानिकांनुसार सूर्य देखील लॉकडाऊन मोडवर गेला आहे. त्यामुळे भीषण थंडी, भूकंप आणि दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.2 / 11nypost.com ने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्याच्या लॉकडाऊनमध्ये जाण्याच्या काळाला वैज्ञानिक सोलल मिनिमम (Solar Minimum) असं म्हणतात. यादरम्यान सूर्यावरील अॅक्टिविटी चिंताजनक कमी होऊ लागते. (इथे वाचा पूर्ण रिपोर्ट : https://nypost.com/2020/05/14/the-sun-has-entered-a-lockdown-period-which-could-cause-freezing-weather-famine/) 3 / 11एक्सपर्ट सांगतात की, आपण सगळे अशा स्थितीचा सामना करणार आहोत, ज्यात सूर्याच्या किरणांमध्ये फारच कमतरता बघायला मिळेल. ही रेकॉर्ड मंदी असेल, ज्यात सनस्पॉट पूर्णपणे गायब होतील.4 / 11द सनच्या रिपोर्टनुसार, अॅस्ट्रोनॉमर डॉ. टोनी फिलीप्स म्हणाले की, आपण सोलर मिनिममकडे जात आहोत आणि यावेळी हे फार खोलवर किंवा जास्त प्रमाणात होणार आहे. ते म्हणाले की, सनस्पॉट हे सांगत आहेत की, याआधी झालेल्या सोलर मिनिममपेक्षा यावेळचा काळ फार अडचणीचा असणार आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)5 / 11यादरम्यान सूर्याच्या मॅग्नेटिक फील्ड फार कमजोर होतील. ज्यामुळे सोलर सिस्टीममध्ये जास्त कॉस्मिक रे येतील.6 / 11टोनी फिलीप्स म्हणाले की, जास्त प्रमाणात कॉस्मिक रे अॅस्ट्रोनॉट्सच्या आरोग्यासाठी फार घातक आहेत. हे पृथ्वीच्या वरील वातावरणातील इलेक्ट्रो केमिस्ट्रीला प्रभावित करतील. यामुळे मोठ्या प्रमाणात विजा कडाडतील.7 / 11नासाच्या वैज्ञानिकांनी चिंका व्यक्ती केली आहे की, हे डाल्टन मिनिममसारखं होऊ शकतं. डाल्टन मिनिमम 1790 ते 1830 दरम्यान आला होता. या काळात मोठ्या प्रमाणात थंडी पडली होती, पिकांचं फार मोठं नुकसान झालं होतं, दुष्काळ पडला होता आणि अनेक ज्वालामुखींमध्ये विस्फोट झाले होते.8 / 11या काळात 20 वर्षात तापमान 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलं होतं. त्यामुळे जगासमोर अन्न संकट निर्माण झालं होतं.9 / 1110 एप्रिल 1815 ला 2 हजार वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ज्वालामुखींचे विस्फोट झाले होते. इंडोनेशियामध्ये यामुळेच साधारण 71 हजार लोक मारले गेले होते. 10 / 11त्याचप्रमाणे 1816 मध्ये उन्हाळाच आला नव्हता. या वर्षाला 1800 आणि थंडीने मृत्यू असं नाव देण्यात आलं होतं. यादरम्यान जुलै महिन्यात बर्फ पडला होता.11 / 11यावर्षी सूर्य ब्लॅंक वाटतो आहे आणि यादरम्यान 76 टक्के सनस्पॉट दिसत नाहीये. गेल्यावर्षी सनस्पॉट 77 टक्के ब्लॅंक होता.