शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरेच्चा! इथं तुम्हाला खाण्याची ऑर्डर देण्यासाठी बोलण्याची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 3:39 PM

1 / 5
जगातील तिसरी सर्वात मोठी फूड कंपनी स्टारबक्सने चीनच्या ग्वांगझू येथे सायलेंट कॅफेची सुरुवात केली आहे. चीनमधील असा हा पहिलाच कॅफे आहे. जिथे 30 मधील 14 कर्मचारी असे आहेत ज्यांना ऐकायला येत नाही.
2 / 5
लोकांना ऐकू न येणाऱ्या लोकांची भाषा समजावी यासाठी प्रेरणा देण्याचं उद्दीष्ट कंपनीने ठेवलं आहे. या कंपनीचे चीनमध्ये 3800 स्टोअर्स आहेत. सायलेंट कॅफेचा इंटीरियर स्पेशल बनविण्यात आला आहे. येथील भिंतींवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत ज्यामुळे ग्राहकांना हे समजणं सोप्पं जाईल.
3 / 5
प्रत्येक फूड आणि लिक्विड ड्रिंक्सला पहिल्यापासून नंबर दिले गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या नंबरकडे इशारा केल्यानंतर ती ऑर्डर घेतली जाईल. किंवा जर कोणती गोष्ट तुम्ही बोलू शकत नसाल तर एका नोटपॅडवर लिहून दिली जाऊ शकते. तसेच कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल कम्युनिकेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.
4 / 5
ग्राहकांना भविष्यात कमी त्रास व्हावा आणि ऐकू न येणाऱ्यांना काम मिळावं यासाठी कंपनीने व्यवस्था केली आहे. कंपनीने गुआंगडॉन्ग डीफ पीपुल असोसिएशनसोबत मिळून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.
5 / 5
स्टारबक्सने याआधी पहिला सायलेंट कॅफेची सुरुवात 2016 मध्ये मलेशिया आणि 2018 मध्ये वॉश्गिंटनमध्ये केली आहे. स्टारबक्सच्या या विशेष उपक्रमाचे कौतुक लोकांकडून करण्यात येत आहे.
टॅग्स :chinaचीन