1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी वेगवेगळे नियमही करण्यात आले आहेत. असाच एक आश्चर्यकारक निर्णय नेदरलॅंडमध्ये करण्यात आला आहे. 2 / 10कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे नेदरलॅंडमध्येही लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण काही अटींसह घरात तीन व्हिजीटर्सला लोक बोलवू शकता. 3 / 10आता सरकारने सिंगल पुरूष आणि महिलांना सेक्स पार्टनर शोधण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सेक्स पार्टनर शोधताना काही गोष्टींची खास काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.4 / 10नेदरलॅंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अॅन्ड द इन्वायर्नमेंटकडून सांगण्यात आले आहे की, सिंगल लोकांनी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्याची व्यवस्था करावी. 5 / 10पण जर कुणामधे कोरोनाची लक्षणे असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये.6 / 10याआधी नेदरलॅंडमध्ये सरकारवर टीका होत होती की, सिंगल लोकांना शारीरिक संबंधाबाबत कुणी काही सल्ला देत नाहीये. 7 / 1023 मार्चपासून नेदरलॅंडमध्ये सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.8 / 10याआधीच्या गाइडलाईनमध्ये सरकारने सांगितले होते की, घरात एखाद व्हिजीटर आला तर 1.5 मीटरचं अंतर ठेवावं. पण नियमावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. 9 / 10RIVM च्या सल्ल्यानुसार सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांकडे स्थायी सेक्शुअल पार्टनर नाहीत, ते त्यांच्यासारख्या लोकांसोबत राहण्याचा आपसात करार करू शकतात. 10 / 10सोबतच याचीही चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे की, दोन्ही किती पार्टनर किती इतर लोकांना भेटणार आहेत. कारण ते जेवढ्या जास्त लोकांना भेटतील कोरोनाचा धोका अधिक वाढेल.