शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 16:04 IST

1 / 10
पृथ्वीबाबत नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी वैज्ञानिक समोर आणत असतात. आता पुन्हा वैज्ञानिकांना एक फारच आश्चर्यकारक गोष्ट सापडली आहे. वैज्ञानिकांना पृथ्वीच्या 16 किलोमीटर आत एक असं स्ट्रक्टर सापडलंय जे 600 मैल मोठं आहे. पण हे अस्तित्वात कसं आलं याची माहिती नाही.
2 / 10
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या जिओलॉजिस्टच्या एका टीमने पृथ्वीच्या गर्भात असलेल्या या भव्य आणि अजब स्ट्रक्चरला शोधलं. हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
3 / 10
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, मेरीलॅंड युनिव्हर्सिटीच्या टीमचे मुख्य डोएयोन किम यांनी सांगितले की, हे स्ट्रक्चर पृथ्वीच्यात आत 16 किलोमीटर खाली मार्केसस आयलंड ते साउथ पॅसेफिक सागरापर्यंत पसरलं आहे.
4 / 10
किम म्हणाले की, हे स्ट्रक्चर जिथे सापडलं त्याला अल्ट्रा लो वेलोसिटी झोन असंही म्हटलं जातं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे स्ट्रक्चर साधारण 620 मैल पसरलं आहे. अशाच प्रकारचं एक स्ट्रक्चर हवाई बेटाच्या खालीही आहे.
5 / 10
किम सांगतात की, आपल्याला पृथ्वीबाबत अजून तेवढी माहिती नाही. त्यापेक्षा जास्त माहिती आपण चंद्राच्या पृष्ठाबाबत मिळवली आहे. आपण पृथ्वीच्या बाहेरील थराऐवजी आतील थरांबाबत कोणतीही माहिती एकत्र केलेली नाही.
6 / 10
कारण कुणालाही पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरसोबत छेडछाड करायची नाहीये. मनुष्याला हेच अजून पूर्णपणे समजलं नाही त्यामुळे ते सावध राहतात.
7 / 10
किम यांच्यानुसार, पहिल्या महायुद्धानंतर आपण हे जाणलं होतं की, पृथ्वीच्या टेक्टोनक प्लेट सरकल्याने भूकंप येतो.
8 / 10
किमनुसार, या स्ट्रक्चरचा संबंध चंद्राच्या जन्मासोबतही असू शकतो. पृथ्वीची एका मोठ्या वस्तूशी टक्कर झाल्याने 4 बिलियन वर्षाआधी चंद्राचा जन्म झाला होता. किमची टीम आता सतत येत असलेल्या भूकंपात आणि या स्ट्रक्चरमध्ये संबंध शोधत आहे.
9 / 10
किमच्या टीमने 1990 पासून ते 2018 पर्यंत आलेल्या सर्वच भूकंपाचा डेटा या स्ट्रक्चरमधून निर्माण होत असलेल्या लो वेलोसिटी तरंगांच्या आधारावर मोजण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा पृथ्वीच्या सर्वात जुन्या भागांपैकी एक आहे.
10 / 10
किमनुसार, नव्याने सापडलेल्या या अनोख्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून हे जाणून घेता येऊ शकतं की, आपण कुठून आलो आणि पृथ्वी कशी तयार झाली.
टॅग्स :Earthपृथ्वीEarthquakeभूकंपInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स