संशोधकांनी शोधला लुप्त झालेला 'सुपरमाउंटन', आकाराने हिमालयन पर्वतरांगेपेक्षा चारपट मोठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:05 IST
1 / 8 हिमालय पर्वतरांगांमध्ये असलेले 'माउंट एव्हरेस्ट' हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची 8,848 मीटर आहे. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या पृथ्वीवर एकेकाळी अशा पर्वत रांगा होत्या, ज्या संपूर्ण खंडात पसरल्या होत्या. 2 / 8 हिमालयापेक्षा खूप मोठ्या असलेल्या या पर्वतरांगांचा आपल्या पृथ्वीच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे. या सुपरमाउंटनच्या निर्मितीबाबत संशोधकांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.3 / 8 संशोधकांना मिळालेल्या माहितीनुसार, हे 'सुपरमाउंटन' 8,000 किमी क्षेत्रात पसरले होते. हे सध्याच्या हिमालयीन श्रेणी (2300 किमी) च्या चौपट आहे. एवढेच नाही तर पृथ्वीच्या इतिहासात त्यांची निर्मिती दोनदा झाली. पहिल्यांदा 2 हजार ते 1800 कोटी वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली. 4 / 8 तर, दुसऱ्यांना 65 ते 50 कोटी वर्षांपूर्वी याची पुन्हा निर्मिती झाली. या दोन सुपरमाउंटनची निर्मिती आणि पृथ्वीवरील उत्क्रांती यांच्यात महत्त्वाचा संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे.5 / 8 'अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी कमी ल्युटेटिअम असलेल्या झिरकॉनचा वापर करुन ही रचना ओळखली. 6 / 8 हे एक प्रकारचे खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वीच्या घटकांचे मिश्रण आहे, जे केवळ उंच पर्वतांच्या मुळांमध्ये आढळते. जिथे ते अत्यंत तीव्र दाब असतो, ज्यामुळे हे तयार होतात.7 / 8 संशोधकांचे म्हणणे आहे की, दोन सुपरमाउंटन निर्मितीच्या घटनांमधील कोणत्याही टप्प्यावर इतर सुपरमाउंटनच्या निर्मितीचा कोणताही पुरावा सापडला नाही. अशा परिस्थितीत या घटना अधिक महत्त्वाच्या ठरतात.8 / 8 पहिल्या सुपरमाउंटला 'नुना' सुपरमाउंट असे म्हणतात. त्याच्या निर्मितीचे वर्ष युकेरियोट्सच्या स्वरुपाशी जुळते आहे. तर, सुमारे 650 आणि 500 दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेल्या दुसर्या सुपरमाउंटनचे नाव 'ट्रान्सगोंडवान'न सुपरमाउंटन आहे.