1 / 7संपूर्ण डोंगरच इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी ढंगात न्हाऊन निघत असेल तर नवलच. चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिऑग्राफिकल पार्कमध्ये असे रहस्यमयी डोंगर आहेत. 2 / 7विविध रंगांच्या वाळू आणि खनिजांनी बनलेले हे डोंगर अनेक वर्षांपासून सौंदर्याची भुरळ घालत आहेत. युनेस्कोने या डोंगराचा आपल्या यादीत समावेश केला आहे.3 / 7चीनच्या उत्तरेकडील किलियन पर्वतरांगेत हा प्रांत येतो. लिंजे आणि सुनन प्रांतही याच सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या परिसरात पसरला आहे. 4 / 7चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी 1920 मध्ये हा प्रांत शोधून काढला. या प्रांतात अशा प्रकारचे सौंदर्य वसले असल्याचे यापूर्वी स्थानिकांना माहितच नव्हते.5 / 7वाळूचे खडक आणि गाळाच्या सच्छिद्र खडकांपासून हे डोंगर तयार झालेत. लोह आणि मॅगनिज सारखी खनिजं विपूल प्रमाणात आहेत. 6 / 7शिवाय भूगर्भातल्या झालेल्या हालचालींमुळे डोंगरात वेगवेगळ्या रंगाचे खडकांचे स्तर पाहायला मिळतात. 7 / 7डेनक्सिया राष्ट्रीय उद्यानाला लिंजे डेनक्सिया सिनिक एरिया असेही म्हटले जाते.