1 / 11दक्षिण सुदानची एक मॉडेल न्याकिम गॅटवेच सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे. या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला क्वीन ऑफ डार्क म्हणून ओळखले जात आहे.2 / 11सध्या गोरे बनण्यासाठी विविध क्रिम बाजारात आहेत. अनेकांना गोरे होण्याची क्रेज असते. पण सुदानमध्ये या मॉडेलचा रंग एकदम काळा आहे, पण तिला या रंगाचा गर्व आहे. 3 / 11मॉडेलिंग क्षेत्रात अतिशय सहजतेने वावरणाऱ्या न्याकिमला वर्णावरून कोणी बोचरी टीका केल्यास हजरजबाबी न्याकिमदेखील त्या व्यक्तीस योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद करते. 4 / 11२४ वर्षांची न्याकीम ही जन्मतःच काळ्या कुळकुळीत रंगाची. जगात न्याकीम अत्यंत आत्मविश्वासानं वावरते, तेसुद्धा ग्लॅमरच्या जगात.सुदानमधली ती अत्यंत यशस्वी मॉडेल आहे.5 / 11न्याकीम इन्स्टाग्रामवर अॅक्टिव आहे. ती ब्लॅक, ब्युटीफुल आणि बोल्डही आहे. तिला सतत तिच्या काळेपणावरुन टोमणे ऐकावे लागतात. 6 / 11उबेर कॅबमधील प्रवासादरम्यान ड्रायव्हरने न्याकिमला तिच्या वर्णावरून प्रश्न विचारला होता. हा किस्सा कथन करताना ती सांगितले की, मला वाईट वाटणार नाही याची खात्री करून उबेर चालकाने विचारले, जर तुला स्किन ब्लिच करण्यासाठी १० हजार डॉलर्स दिले, तर तू स्किन ब्लिच करशील का? यावर माझे उत्तर नाही असे होते आणि त्याच्या प्रश्नावर मला हसू आले. 7 / 11कितीही पैसे देऊ केले तरी मी स्वत:च्या त्वचेशी छेडछाड करणार नाही. देवाने बहाल केलेल्या रंगासोबत मी छेडछाड का करावी, असा प्रश्नदेखील तिने ड्रायव्हरकडे उपस्थित केला.8 / 11तर तुझा ‘डार्क कलर’ ही देवाची देण आहे असे तुझे मानणे आहे, असे म्हणत न्याकिमच्या उत्तरावर ड्रायव्हरने प्रतिक्रिया नोंदवली.9 / 11दिसण्यावरून मी कशा स्वरुपाच्या प्रश्नांना सामोरी गेले आहे याचा अंदाजदेखील तुम्ही बांधू शकणार नाही, असे ती सांगते.10 / 11सुदानच्या या मॉडेलला सोशल मीडियावर क्वीन ऑफ डार्क अशी पदवी दिली आहे. तिने या पदवीबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.11 / 11तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणाली, जगात प्रत्येक माणूस सुंदर असतो, आपला जो स्कीनचा कलर आहे, तो देवाने दिला आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल वाईट का वाटून घ्यावे.