शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Playing Cards Story: पत्त्यांमध्ये राजा-राणीपेक्षा एक्का का भारी ठरतो? एवढे खेळला पण कधी प्रश्न पडलाय? हे आहे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 13:51 IST

1 / 6
सध्या ऑनलाईनच्या नकली गेमनी खऱ्या खेळांची मज्जाच हिरावली आहे. काय दिवस होते, आपण सारे एकत्र कॅरम, सापशिडी, पत्त्यांसारखे बैठे खेळ खेळायचो. आता हेच खेळ त्या आभासी जगात खेळत बसतो, पण तो आनंद आता राहिला नाही. आजकाल तर रमीदेखील ऑनलाईन आला आहे. पण या पत्त्यांचा खेळ खेळताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? राजा-राणी पत्त्यांच्या खेळात सर्वात शक्तीशाली असायला हवे होते, मग एक्का का बाजी मारून जातो? एकदा तरी पडला असेलच ना...
2 / 6
भारतात पत्ते खेळण्याचा इतिहास खूप जुना आहे. जवळपास हजार वर्षांपूर्वीचा. पत्त्यांचा खेळ जगभरात खेळला जात होता. फक्त प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे होते. एकेकाळी हा राजघराण्यांतील खेळ असायचा. कालांतराने तो सण-उत्सवांवर खेळला जाऊ लागला. इतिहासकारांच्या दाव्यानुसार पत्त्यांचा खेळ चीनमधून सुरु झाला होता. त्यांच्या लोककथा पात्रांचे पत्ते बनविले जायचे आणि खेळले जायचे.
3 / 6
20 व्या शतकात भारतात विविध प्रकारचे कार्ड डिझाइन आले. पुण्यातील चित्रकला प्रेसने रवि वर्माच्या प्रिंट्स आणि अल्फाबेट कार्ड्स छापल्या, तर कमला सोप फॅक्ट्रीच्या ब्रँडेड दिलकुश प्लेइंग कार्ड्स आणि एअर इंडियाच्या संग्रहण्यायोग्य कार्ड्सची लोकप्रियता वाढली.
4 / 6
भारताचा इतिहास थोडा वेगळा आहे. भारतातील पत्ते खेळण्याचा इतिहास गोलाकार गंजिफा/गंजप्पा पत्त्यांपासून सुरू होतो. या पत्त्यांचा पहिला उल्लेख मुघल सम्राट बाबरच्या चरित्रातून होतो. 1527 मध्ये मुघल सम्राट बाबरने सिंधमधील त्याचा मित्र शाह हुसेन याला गंजिफाचा सेट दिला होता. गंजिफा पारशी संस्कृतीपासून प्रेरित असल्याचे इतिहासकारांचे मत आहे.
5 / 6
आज जी आधुनिक पत्ते खेळण्याची पद्धत आहे ती, फ्रान्सची सामाजिक स्थिती दर्शवते. त्यावरून राजा राणी, एक्का आदींचे स्थान आले आहे. इस्पिक, बदाम, किल्व्हर आणि चौकट (चौकड) अशी चार चिन्हांची कार्ड पत्त्यांमध्ये असतात. फ्रेंच डेकमध्ये रॉयल्टीचे प्रतीक असलेले कुदळ, पाळकांसाठी पान (हृदय), व्यापाऱ्यांसाठी वीट किंवा हिरे आणि शेतकरी आणि मजुरांसाठी चिडी (क्लब) होते. तेच यात दिसतात, असे इतिहासकार सॅम्युअल सिंगर यांनी स्पष्ट केले आहे.
6 / 6
फ्रान्समध्ये मोठी क्रांती झाली. Ace म्हणजेच Ace (A) फ्रेंच क्रांतीनंतर डेकचे पहिले कार्ड एक्का बनला. सामान्य जनतेने राजेशाही कशी उलथून टाकली हे यातून पुढे आणायचे होते. त्यामुळे पत्त्याच्या खेळात राजापेक्षा अधिक ताकदवान हा एक्का बनला. जो सामान्य माणसाचे किंवा क्रांतिकारकांचे प्रतीक होता.