By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 15:00 IST
1 / 5ईशान्य भारतातील मेघालय राज्यात खासी आणि जैतिया टेकड्यांचा परिसर हा विस्तृत डोंगराळ भाग आहे. या परिसरातील नद्यांच्या दोन्ही तीरावर असलेल्या भल्या मोठ्या वृक्षांची दुय्यम मुळे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे सरळ वाढत गेल्यामुळे त्यांचे नदीमार्गाच्या थोडे वर नैसर्गिक पूल बनले आहेत. यांना झाडांच्या मुळांचे पूल असे म्हटले जाते. 2 / 5अशिया खंडात 2003 मध्ये मेघालयातील पूर्व खासी हिल्समध्ये मावलिन्नोंग या नावाचे खेडे सर्वात स्वच्छ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. झाडांच्या मुळांपासून बनविलेल्या पुलांसाठी हे खेडे प्रसिद्ध आहे. 3 / 5खासी हिल्समधील खेडी एकमेकांशी पाथवेजने जोडलेली आहेत. या पाथवेजना ‘किंग्ज वे’ असे म्हटले जाते. 4 / 5या नेटवर्कच्या माध्यमातून फिकुस इलास्टिकाची शेकडो जिवंत मुळे एकमेकांशी जोडली जाऊन त्यांचा पूल तयार केला जातो. हे मुळांचे पूल (त्यातील काही तर शेकडो फूट लांब आहेत) प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी दहा ते 15 वर्षे घेतात. 5 / 5हे पूल अतिशय बळकट असतात. त्यातील काही तर एकाचवेळी 50 किंवा त्यापेक्षा जास्त माणसांचे वजन सहन करू शकतात.