By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:54 IST
1 / 8बॅटमॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका यासारखे सुपरहिरो कोणाला आवडणार नाहीत? मोठा पडदा गाजवणारे हे सुपरहिरो मलेशियातील एका तरुणाकडे चक्क घरकाम करतात.2 / 8चित्रपटांमध्ये आपल्या सुपर पावर्सने जगाला वाचवणारे, शत्रूचा सामना करणारे सुपरहिरो मलेशियन तरुणाच्या घरातील सगळी कामं करतात.3 / 8मलेशियन तरुणानं ही कमाल केलीय फोटोग्राफीच्या कौशल्यातून. तरुणानं फोटोग्राफी करताना वापरलेल्या अँगल्समुळे प्रत्यक्षात तळहाताएवढे असलेले सुपरहिरो फोटोंमध्ये तरुणाइतके दिसतात.4 / 8फोटोग्राफी करताना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ सुपरहिरोला सेट करायचं आणि मग आपण त्या फ्रेममध्ये अॅडजस्ट व्हायचं, असा फंडा तरुणानं वापरला आहे.5 / 8या तरुणानं काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण या तरुणाच्या घरी सुपरहिरो सफाईचं काम करतात, माळीकाम करतात, गाडीतून सामान काढतात आणि कपडेदेखील वाळत घालतात.6 / 8मलेशियन तरुणाचं घर सुपरहिरोजनी भरलेलं आहे. हा तरुण सुपरहिरोंकडून स्वत:चं चित्रदेखील काढून घेतो.7 / 8अप्रतिम फोटोग्राफी कौशल्याच्या जोरावर तरुणानं जबरदस्त फोटो काढले आहेत. 8 / 8सध्या सोशल मीडियावर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी या फोटोंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.