शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जिवंत सापाला चावून चावून फेकतो 'हा' जीव, शेजारील देशाचा आहे राष्ट्रीय प्राणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:10 IST

1 / 8
Pakistan national animal: प्रत्येक देशाचे राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी ठरलेले असतात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. पण पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता हे तुम्हाला माहीत नसेल.
2 / 8
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी एक बकरी आहे. पण ही काही साधीसुधी बकरी नाही. या बकरीला मार्खोर म्हटलं जातं. मार्खोर एक खास आणि ताकदवान बकरी आहे. जी हिमालय आणि आजूबाजूच्या परिसरात आढळते. तिचे घुमावदार शिंग तिची ओळख आहेत. त्याहून महत्वाची बाब म्हणजे या प्राण्याचा सगळ्यात मोठा वैरी साप असतो.
3 / 8
मार्खोर आपली शक्ती आणि खास गोष्टींसाठी ओळखला जाणारा प्राणी आहे. खासकरून याची सापांसोबत लढण्याची क्षमता. ही बकरी सापांना शोधून, त्यांना चावून फेकून देते. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने याच्या अद्वितीय गुणामुळे मार्खोरला आपलं प्रतीक चिन्ह बनवलं आहे.
4 / 8
मार्खोर शब्द पश्तो भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ 'साप खाणारा' किंवा 'सापाचा विनाश करणारा' असा होताो. लोककथांनुसार मार्खोर आपल्या शक्तीशाली शिंगांचा वापर करून सापांना मारणे आणि त्यांना खाण्यात सक्षम आहे.
5 / 8
मार्खोरबाबत आणखी एक मान्यता आहे की, त्याच्या तोंडातून निघणारं एक द्रव्य फेना सर्पदंशातून विष काढण्यास मदत करतं. लोक मानतात की, मार्खोरकडे अशी विशेष शक्ती आहे. ज्याद्वारे ते सापांना मारतात आणि त्यांच्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवतात.
6 / 8
ही बकरी इतकी शक्तीशाली असते की, ती जिथे राहते तिथे साप आढळून येणं अशक्य आहे. त्यामुळे सापाचा सगळ्यात मोठा शत्रू मानली जाते. या अद्वितीय व्यवहारामुळे या बकरीला खास सन्मान मिळाला आणि हा प्राणी पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी बनला.
7 / 8
मार्खोर बकरी खरंच अद्भुत आहे. ही बकरी ६ फूट उंच उभी राहू शकते आणि त्यांचं वजन २४० पाउंडपर्यंत असू शकतं. अंगावर दाट आणि लांब केस असतात. ही बकरी उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्किस्तानमध्ये डोंगराळ भागात आढळते.
8 / 8
मात्र, आता मार्खोर लुप्त होत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. याची अद्वितीय शारीरिक संरचना पर्यावरणातील संतुलन कायम ठेवण्यासाठी महत्वाची आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स