शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कधी जगातील सर्वात सुंदर राष्ट्राध्यक्षा म्हणून गाजली होती कोलिंडा, पण सध्या ती काय करते...?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 3:00 PM

1 / 9
कोलिंडा ग्रेबर कितारोविच या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. त्यांना जगातल्या सर्वात सुंदर प्रेसिडेन्ट म्हटलं जात होतं. त्या फार आकर्षक आणि सुंदर होत्या. जगभरातील मीडिया त्यांच्या सुंदरतेचं कौतुक करत होता. 2018 मध्ये त्या चांगल्याच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांचे कित्येक फोटो चर्चेचा विषय ठरले होते. चला जाणून घेऊ जगभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या कोलिंडा आता काय करतात.
2 / 9
आत्ता आतापर्यंत कोलिंडा ग्रेबर कितारोविच यांना जगातल्या सर्वात सुंदर प्रेसिडेन्ट मानलं जात होतं. त्या इतक्या सुंदर आहेत की, त्यांना जगभरातील मीडियाने एका सुराने अशी राष्ट्राध्यक्षा मानलं होतं जी सर्वात सुंदर आहे. त्या 2015 मध्ये क्रोएशियाच्या प्रेसिडेन्ट बनल्या होत्या.
3 / 9
मीडियाने नेहमीच कोलिंडा यांच्या फॅशन सेन्सचं भरभरून कौतुक केलं होतं. कारण त्यांचा फॅशन सेन्स फारच कमाल होता. जेव्हा त्या 2018 मध्ये रशियातील फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा फारच चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
4 / 9
हा फोटो तेव्हांचा आहे जेव्हा त्या क्रोएशियाच्या टीमची टी-शर्ट घालून स्टेडिअमच्या व्हिआयपी गॅलरीतून प्रेक्षकांना अभिवादन करत होती. ती तिच्या टीमचा उत्साह वाढवत होती. यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुएल मॅक्रो आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आहेत.
5 / 9
हा फोटो बघा. हा फोटो 2018 मधील सर्वात जास्त गाजलेल्या फोटोंपैकी एक आहे. फ्रान्सची टीम जिंकली होती आणि क्रोएशिया टीम हरली होती. हा विजयाचा आनंद मॅक्रो यांनी दु:खी कोलिंडा यांच्यासोबत असा वाटला.
6 / 9
कोलिंडा यांना पुन्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी यायचं होतं. त्यांनी निवडणुकही लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्या आता पदावर नाहीत. पण त्यांची सक्रियता जराही कमी झालेली नाही.
7 / 9
इंटरनॅशनल ऑलम्पिक कमेटीने त्यांना त्यांच्या एक्झीक्युटीव्ह कमेटीचं सदस्य बनवलं आहे. त्या त्यांच्या देशातील खेळ संघांशी जुळलेल्या आहेत. त्या एक जबरदस्त फुटबॉल लव्हर आहेत. त्या तरूण असताना फुटबॉल खेळायच्या. त्या खेळाबाबत फार क्रेझी आहेत.
8 / 9
सद्या त्या तीन कामे करताना दिसत आहेत. देशातील टीव्ही डिबेट्स आणि स्पीचेजमध्ये त्या दिसतात. खेळाच्या विश्वासोबत त्यांनी एक अनोखं नातं जोडलं आहे आणि आपलं घरही सांभाळत आहेत.
9 / 9
कोलिंडा 1996 मध्ये जॅकोवला भेटल्या होत्या. दोघांमध्ये प्रेम झालं. दोघांनी लग्न केलं. जॅकोव हे एका मोठ्या कंपनीत आयटी कंसल्टंट आहेत. ते इंजिनिअर आहेत. दोघांना दोन मुली आहे. कोलिंदा आता जास्त वेळ परिवाराला देत आहेत.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय