'या' देशात घराच्या छतांवर उगवलं जातं गवत, हिरव्या छतामागे दडलं आहे इंटरेस्टींग रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:36 IST
1 / 7Norway Green Roof House: जशी बारा कोसावर गेल्यावर भाषा बदलते तसेच जगात थोड्या थोड्या अंतरावर वेगळी संस्कृती बघायला मिळते. भाषा तर बदलतातच, लोकांचं राहणीमान, कपड्यांची पद्धत, रितीरिवाजही बदलतात. आज आम्ही आपल्याला अशाच एका इंटरेस्टींग कल्चरबाबत सांगणार आहोत. जिथे पूर्ण घर शेवाळ किंवा गवताखाली बदलेलं असतं.2 / 7नॉर्वेमध्ये अनेकदा हे बघायला मिळतं की, येथील घरांचं छत आणि भिंती पूर्णपणे हिरव्या दिसतात. हा हिरवेपणा शेवाळ किंवा गवताचा असतो. म्हणजे ही घरं शेवाळ किंवा गवतानं कव्हर केलेले असतात. 3 / 7हे बघून आपल्याला प्रश्न पडू शकतो की घराची छत शेवाळ किंवा गवतानं कव्हर का करून ठेवतात? चला तर पाहुया यामागील इंटरेस्टींग कारण. 4 / 7सगळ्यात आधी तर हे पाहुया की, थंडीच्या दिवसात यानं कशी मदत मिळते. थंडीच्या दिवसात नॉर्वेमध्ये तापमान मायनस होतं. अशात येथील घरांवर असलेलं शेवाळ किंवा गवत नॅचरल इन्सुलेटरसारखं काम करतं. गवत आणि शेवाळानं घरं बर्फापासून सुरक्षित राहतात. सोबतच घरातील तापमान कंट्रोल करण्यासही मदत मिळते.5 / 7येथील घरं जास्तकरून लाकडांची असतात. अशात शेवाळ आणि गवत पावसाळ्यात आणि बर्फवृष्टीत घराच्या लाकडांना सुरक्षा देतं. त्याशिवाय हा पद्धतीनं ध्वनी म्हणजे आवाजही कंट्रोल राहतो. ज्यामुळे घराच्या आत कमालीची शांतता राहते.6 / 7घरांच्या छतावर शेवाळ आणि गवत उगवण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. याला पद्धतीला 'turf roof' किंवा 'green roof' म्हटलं जातं. अशी घरं खासकरून नॉर्वे, स्वीडन आणि आइसलॅंडमध्ये बघायला मिळतात.7 / 7छतावर शेवाळ किंवा गवत दिसायला सुद्धा सुंदर दितसतं. त्यामुळे येथील काही गावं पर्यटकांसाठी आकर्षणाचं बिंदू ठरत आहेत. पर्यटकांनी निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव येत आहे.