बाबो! 'या' व्यक्तीच्या ६ गर्लफ्रेन्ड एकत्र आहेत गर्भवती, कधी गळ्यात साखळी बांधून फिरवत होता मुली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 14:38 IST
1 / 9नायजेरियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला पार्टीत ६ गर्भवती महिलांसोबत बघण्यात आलं आहे. सर्वच गर्भवती महिलांना एकसारखे कपडे घातले आहेत. पण यांच्याबाबत जी बाब समोर आली आहे ती सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. या सर्वच महिलांच्या गर्भात एकाच व्यक्तीचं बाळ वाढत आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीच्या ६ प्रेयसी गर्भवती आहेत त्याचा इतिहास फार वाईट आहे. 2 / 9सोशल मीडिया सेलिब्रिटी प्रेट्टी माइकला त्याच्या होणाऱ्या बाळांच्या सहा आईंसोबत स्पॉट करण्यात आलंय. या सहा महिलांच्या गर्भात माइकचे बाळ वाढत आहेत.3 / 9या सर्वच प्रेयसींसोबत तो नायजेरियातील एका वेडींग पार्टीत पोहोचला होता. तिथे या सर्व महिला एकसारख्या कपड्यांमध्ये दिसल्या. माइकने इन्स्टा फॅन्सना सांगितले की, तो त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण जगतोय.4 / 9माइकचं खरं नाव माइक एजे नवली नवगु आहे. तो नायजेरियातील लेगोसमधील नाइट क्लबचा मालक आहे. तो या सर्व महिलांसोबत अभिनेता विलियम्स उचेम्बाच्या लग्नात पोहोचला होता.5 / 9यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून स्टेटमेंट साइन करून घेतलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, तो कोणत्याही महिलेसोबत असं पुन्हा करणार नाही. आता तो ६ प्रेयसी गर्भवती असल्याचे पुन्हा चर्चेत आलाय.6 / 9या महिलांपैकी दोन त्याच्या पूर्वीच्या प्रेयसी आहेत तर तीनसोबत त्याचं आताही रिलेशन सुरू आहे. पण या महिलांना एकमेकींपासून काहीच समस्या नाही. त्या बहिणीसारख्या सोबत राहतात.7 / 9माइकने सांगितले की, ही सगळी त्याची फॅंटसी आहे. सर्वच गर्भवती महिला पार्टीत आनंदी दिसत होत्या. सगळ्याच एन्जॉय करत होत्या आणि डान्स करत होत्या.8 / 9हे फोटो पाहून काही लोकांना यावर टीका केली. ते म्हणाले की, हे केवळ त्याने अटेंशन मिळवण्यासाठी केलं. तर काही लोकांनी गमत केली की, ६ पत्नींसोबत ६ सासू फ्री मिळणार.9 / 9माइकचं खरं नाव माइक एजे नवली नवगु आहे. तो नायजेरियातील लेगोसमधील नाइट क्लबचा मालक आहे. तो या सर्व महिलांसोबत अभिनेता विलियम्स उचेम्बाच्या लग्नात पोहोचला होता.