1 / 5खारडुंग ला- लडाखमधील या रस्त्याचा समावेश देशातील सर्वात अवघड रस्त्यांमध्ये केला जातो. 18 हजार 380 हजार फुटांवरील हा रस्ता चालकाच्या कौशल्याची परीक्षा पाहतो. वारंवार होणारी हिमवृष्टी, वातावरणात ऑक्सिजनचं अपुरं असलेलं प्रमाण यामुळे हा रस्ता अतिशय आव्हानात्मक आहे. 2 / 5किन्नोर रोड- हिमाचल प्रदेशातील हा रस्ता अतिशय अरुंद आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला डोंगर आहेत. या रस्त्यावर येणारी अनेक वळणं अतिशय कठीण आहेत. 3 / 5किश्वर-कैलास रोड- या रस्त्यावर एकच मार्गिका आहे. या रस्त्यावरील चढ इतका कठीण आहे की, एक चूक याठिकाणी जीवघेणी ठरु शकते. 4 / 5लेह-मनाली द्रुतगती मार्ग- हा रस्ता पाहिल्यावर तुम्हाला जब वी मेटमधील शाहिद आणि करिनावर चित्रित झालेलं गाणं नक्की आठवेल. या रस्त्यावर प्रवास करताना दिसणारं दृष्य विलोभनीय आहे. मात्र हा रस्ता वाहन चालकांची सत्त्वपरीक्षा पाहतो. 5 / 5थ्री लेव्हल झिग झॅग रोड: सिक्कीममधील हा रस्ता नागमोडी वळणांचा आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय सुंदर दिसतो. मात्र याच वळणांमुळे हा रस्ता वाहन चालकांसाठी मोठं आव्हान ठरतो. या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते.