1 / 5बिक्स्बी क्रीक ब्रिज, कॅलिफॉर्निया, अमेरिका: 1932 मध्ये या पुलाचं काम पूर्ण झालं. बिक्स्बी खाडीवरील हा पूल जमिनीपासून 260 फूट उंचावर आहे. या पुलाच्या बांधणीसाठी 2 लाख डॉलर इतका खर्च आला होता. या पुलावरुन आसपासच्या भागाचं नयनरम्य दृश्य दिसतं. 2 / 5टॉवर ब्रिज, लंडन, युनायटेड किंग्डम : 120 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आजही भक्कम स्थितीत आहे. थेम्स नदीवरील हा पूल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लंडनला भेट देतात. या पुलाची रचना अतिशय उत्तमरित्या करण्यात आली आहे. या पुलाखालून मोठी जहाजंदेखील जाऊ शकतात. त्यावेळी पूल मध्यभागातून वर होतो आणि एक कमान तयार होतो. त्या कमानीखालून जहाजं ये-जा करतात. 3 / 5सिडनी हार्बर, ऑस्ट्रेलिया: सिडनीमधील हा पूल अतिशय लोकप्रिय आहे. हा सुंदर पूल ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. या पुलाची लांबी 3 हजार 770 फूट इतकी आहे. 4 / 5ब्रूकलिन ब्रिज, न्यूयॉर्क, अमेरिका: न्यूयॉर्कमधील हा प्रसिद्ध पूल ब्रूकलिन आणि मॅनहटनला जोडतो. ईस्ट रिव्हरवर बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी 1 हजार 596 फूट इतकी आहे. 1869 मध्ये या पुलाच्या उभारणीला सुरुवात झाली. यानंतर 14 वर्षांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. 5 / 5मिलाऊ वायडट, फ्रान्स: दक्षिण फ्रान्समधील हा पूल आणि त्या शेजारचा परिसर अतिशय सुंदर आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखला जातो. या पुलाची उंची 890 फूट इतकी आहे.