या आईची बातच न्यारी; हिचं सौंदर्य मुलींपेक्षा भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 21:30 IST
1 / 5सोशल मीडियावर सध्या या मायलेकींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये आई आणि मुली जवळपास सारख्याच दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वयात 20 वर्षांचं अंतर आहे. फोटोतील दोन मुलींचं वय 41 आणि 43 आहे. तर आईचं वय 63 वर्षे. मात्र या तिघीही अतिशय तरुण दिसत आहेत. 2 / 5या फोटोत मध्ये उभी असलेली मुलींची आई आहे. तर तिच्या दोन्ही बाजूंना तिच्या मुली आहेत. 3 / 5सध्या या मायलेकींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून मुली कोण आणि आई कोण, असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. 4 / 5अनेकांनी या तिघींना त्यांच्या सौंदर्याचं रहस्य विचारलं. या प्रश्नाला फक्त शाकाहारी जेवण असं उत्तर या मायलेकींनी दिलं. 5 / 5या तिघीही त्वचेची शक्य तितकी काळजी घेतात. याशिवाय डाएटदेखील काटेकोरपणे पाळतात.