सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:09 IST
1 / 12कितीही नाही म्हटलं तरी अजूनही काही देशांमध्ये वर्णद्वेष केला जातो. फॅशन विश्वात तर सगळं सुंदर लागतं. पण इथे सुंदर म्हणजे गोरं ही सुंदरतेची परिभाषा दिसते. मात्र, हीच सुंदरतेची परिभाषा बदलणारी एक मॉडल आहे. 2 / 12Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका.3 / 12Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका.4 / 12Nyakim तिच्या अतिशय डार्क त्वचेच्या माध्यमातून सुंदरतेची परिभाषा बदलण्यासाठी पुढे सरसावली आहे आणि महिलांना ती प्रोत्साहनही देत आहे.5 / 12अवघ्या २४ वर्षांची आफ्रिकन मॉडेल आणि फॅशन आयकॉन सध्या Minneapolis मध्ये राहते. महत्वाची बाब म्हणजे तिला तिच्या रंगाबाबत अजिबात कमीपणा वाटत नाही. याबाबतच लोकांमध्ये ती जागरूकताही करते आहे.6 / 12फॅशन इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या भेदभावाला ती वाचा तर फोडतेच शिवाय जगभरातील कृष्णवर्णीयांचा ती आवाज झाली आहे.7 / 12तिला 'Queen of Darkness' असं टायटलही दिलं गेलं असून ती “Black is bold, black is beautiful, black is gold असा नारा देते.8 / 12ती लोकांना सांगते तुम्ही तुमच्या त्वचेवर, त्वचेच्या रंगावर प्रेम करा. मग तो रंग कोणताही असो.9 / 12सोशल मीडियातही ती चांगली लोकप्रिय असून तिच्या फोटोंना पसंतीही मिळते. 10 / 12तिने किस्सा सांगितला होता की, एका टॅक्सी ड्रायव्हरने तिला त्वचेवर ब्लीच करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर ती केवळ हसली होती.11 / 12वर्णद्वेषाच्या शिकार झालेल्या अनेक मुलींसाठी ती आदर्श ठरत आहे. 12 / 12इतकं असूनही ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडल आहे.