1 / 8जेव्हा एक तरूण आणि तरूणीचं लग्न होतं तेव्हा दोघांच्या मनात अनेक अपेक्षा असतात आणि आयुष्यभराची स्वप्ने असतात. दोघेही जेव्हा एकमेकांचा हात हाती घेतात तेव्हा आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतात. पण आयुष्यातील कोणतं सत्य एकमेकांना सांगायचं याचाही निर्णय ते घेतात. 2 / 8अनेकदा लोक त्यांच्याबाबतचं सत्य लपवतात तर काही वेळ सत्य सांगतात. पण हेच करणं त्यांना कधी कधी महागात पडतं. असंच करणं एका नव्या नवरीला महागात पडलं. पतीला जसं तिच्याबाबत सत्य समजलं त्याने आपल्या नव्या नवरीला सोडलं आणि लग्नही मोडलं.3 / 8मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या घटस्फोटाची केस साधारम 3 वर्षापासून कोर्टात प्रलंबित आहे. अनेकदा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो कोणत्याही स्थितीत तयार झाला नाही. अखेर त्यांचं लग्न मोडलं. पण नवरीने आपल्या पतीला असं काय सांगितलं होतं की, त्याने सुहागरातच्या दिवशीच नवरीसोबत नातं तोडलं?4 / 8ही घटना 2022 मध्ये मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून समोर आली होती. इथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरूणाचं इथेच राहणाऱ्या एका तरूणीसोबत लग्न झालं होतं. त्यावेळी तरूणीच वय 21 वर्षे होतं. दोन्ही परिवारांच्या सहमतीने धडाक्यात लग्न लावण्यात आलं होतं. लग्नानंतर दोघांची पहिली रात्र होती. 5 / 8तेव्हाच नवरीने पतीला तिच्याबाबत एक सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. दोघे जसेही रूममध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी एकमेकांशी बोलणं सुरू केलं. काही गोष्टी नवरदेवाने सांगितल्या तर काही नवरीने. अशात नवरीने तिच्या आयुष्यातील एक असं सत्य नवरदेवाला सांगितलं जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो लगेच रूमच्या बाहेर गेला.6 / 8नवरीने लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला सांगितलं की, तिच्यासोबत रेप झाला होता. तिने सांगितलं की, तिच्या मामाच्या मुलाने लग्नाच्या आधी तिच्यासोबतच हे कृत्य केलं होतं. मुलीने तर मोठ्या हिंमतीने तिच्या आयुष्यातील हे सत्य पतीला सांगितलं. पण हे समजल्यावर पती संतापला आणि त्याने कुटुंबातील लोकांना जमा करून हे सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिला माहेरी सोडून आला.7 / 8नवरदेवाच्या या निर्णयात त्याच्या परिवारानेही त्याला साथ दिली. यानंतर मुलीकडील लोकांनी अनेकदा प्रयत्न केला, पण तो पत्नीला घरी घेऊन गेला नाही. वाद इतका वाढला की, मुलाने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज केला. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही मामाच्या मुलावर रेपचा गुन्हा दाखल केला. हैराण करणारी बाब म्हणजे यानंतरही तिचा पतीला तिला सोबत ठेवण्यास तयार नव्हता.8 / 8मुलीकडील लोकांनी सगळे प्रयत्न केले, पण नवरदेवाने लग्न मोडण्याचाच निर्णय घेतला होता. मुलाकडील लोकांचं मत होतं की, ते पीडित सूनेला आपल्या घराची लक्ष्मी बनवू शकत नाहीत आणि यामुळेच ते त्यांच्या मुलाच्या निर्णयाला साथ देत आहेत. कोर्टाने अनेकदा मुलीला तिची बाजू मांडण्यासाठी बोलवलं होतं. पण ती आली नाही. त्यानंतर दोघांना घटस्फोट देण्यात आला.