शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लग्न करण्याची सवय...अशी महिला जिने केली सगळ्यात जास्त लग्ने, एक लग्न तर ३६ तासांचंच होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:26 IST

1 / 8
तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल की, ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आहेत. काहींनी दोन लग्न केली असतील तर काहींनी चार लग्ने केली असतील. पण जगात सगळ्यात जास्त लग्न करणारी महिला तुम्हाला माहीत आहे का? नक्कीच नक्कीच माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला याच महिलेबाबत सांगणार आहोत. या महिलेनं दोन डझनांपेक्षा जास्त लग्ने केली होती.
2 / 8
अमेरिकेची लिंडा वोल्फ जगातील सगळ्यात जास्त लग्न करणारी महिला आहे. तिनं २३ लग्ने केली होती. यासाठी लिंडाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.
3 / 8
असं सांगण्यात येतं की, लिंडानं पहिलं लग्न ती १६ वर्षांची असताना केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर तिनं वेगवेगळ्या लोकांना अनेकदा लग्न केलं. काही लग्ने तर काही महिन्यांसाठीच होती तर काही लग्ने काही वर्ष टिकली.
4 / 8
लिंडाचं वैवाहिक जीवन फारच अस्थिर होतं. अनेकदा घटस्फोट झालेत. तर काहींमध्ये पतीचं निधन झालं. काही लग्नांमधून तिच वेगळी झाली. तिच्या नावे असाही रेकॉर्ड आहे की, तिनं एकदा ज्या व्यक्तीला सोडलं त्याच्यासोबत पुन्हा लग्न केलं नाही.
5 / 8
लिंडा वोल्फ सगळ्यात कमी काळाचं लग्न हे ३६ तासांचं होतं. तर तिचं सगळ्यात जास्त टिकलेलं लग्न ७ वर्षाचं होतं. तिनं ज्या पुरूषांसोबत लग्ने केली त्यातील काही सामान्य जीवन जगत होते, तर काही खास व्यक्ती होते.
6 / 8
लिंडानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लग्न करण्याची सवय लागली होती. एकटं राहण्याची तिला भीती वाटत होती आणि त्यामुळे तिनं अनेक लग्ने करण्याचा निर्णय घेतला.
7 / 8
मात्र, लिंडा तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये एकटीच राहत होती. शेवटच्या लग्नानंतर तिनं एकटं राहण्याचा निर्णय घेतला होता. ती एक शांत जीवन जगत होती. वयाच्या ६९ व्या वर्षी २००९ मध्ये तिचं निधन झालं.
8 / 8
लिंडा वोल्फचा हा अनोखा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आला आहे. ती जगातील सगळ्यात जास्त लग्ने करणारी पहिली महिला बनली.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके