म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'ही' आहे जगातली दुसरी सर्वात खोल गुहा, फोटो पाहूनच येईल चक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:17 IST
1 / 5जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्याला थक्क करून सोडतात आणि आश्चर्यजनक वाटतात. असंच एक ठिकाण जॉर्जियाच्या अबखाजियामध्ये आहे. इथे जगातली दुसरी सर्वात खोल गुहा आहे. ही गुहा इतकी खोल आहे की, वरून पाहिल्यावरच भीतीने अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. 2 / 5या गुहेचं नाव क्रुबेरा गुहा आहे. या गुहेची खोली २१९७ मीटर म्हणजे ७२०८ फूट इतकी आहे. तशी तर इथे पर्यटकांची गर्दी नेहमीच असते. पण फारच दुर्गम परिसर आहे. त्यामुळे इथे जाण्यायोग्य वेळ वर्षातील केवळ चार महिनेच असतो. (Image Credit : wikimonks.com)3 / 5क्रुबेरा गुहेचा शोध १९६० मध्ये लावण्यात आला होता. या गुहेला वोरोन्या गुहा या नावानेही ओळखले जाते. वोरोन्याचा अर्थ होतो कावळ्यांची गुहा. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे जेव्हा १९८० मध्ये पहिल्यांदा या गुहेत प्रवेश करण्यात आला तेव्हा इथे खूप सारी कावळ्यांची घरटी आढळली होती.4 / 5तसे तर या गुहेत वैज्ञानिकांच्या अनेक टीम संशोधनासाठी गेल्या होत्या. पण २०१२ मध्ये वेगवेगळ्या देशातील ५९ वैज्ञानिकांची एक टीम यात उतरली होती. तेव्हाच या गुहेची खोली २१९७ मीटर म्हणजे ७२०८ फूट मोजली गेली. या टीमने या गुहेत एकूण २७ दिवस मुक्काम केला होता. (Image Credit : mymodernmet.com)5 / 5या गुहेत जाण्यासाठी लोकांना सहजासहजी परवानगी मिळत नाही. झालं असं की, अबखाजियाने १९९९ मध्ये स्वत:ला जॉर्जियापासून वेगळं स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं होतं. पण तिकडे जॉर्जिया अजूनही या भागाला आपला भाग मानतं. त्यामुळेच या ठिकाणाबाबत नेहमीच मतभेद सुरू असतात. त्यामुळेच पर्यटकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो.