शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 'इथं' भींतींवरही केली जाते शेती; धान्यांसह भाज्यांचीसुद्धा घेतली जातात पीकं, पाहा फोटो

By manali.bagul | Updated: September 24, 2020 19:53 IST

1 / 7
सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रगत तंत्रांचा वापर शेतीसाठी केला जातो. भारताशिवाय इतर देशांमध्ये अधुनिक तंत्रांचा वापर करून शेती केली जाते. भारतात तुम्ही जमीनीवर शेती होताना पाहीले असेल किंवा एकावर एक मजल्यावर शेती केली जाते. ही पद्धत तुम्ही ऐकून असाल. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी भींतींवर शेती केली जाते. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
2 / 7
या भींतींवर धान्यांसह भाज्यांचेही उत्पादन घेतले जाते. या पद्धतीला वर्टीकल फार्मिंग असं म्हणतात. हळूहळू जगभरात शेती करण्याची ही पद्धत विस्तारत आहे.
3 / 7
वर्टीकल फार्मिंग म्हणजेच भितींवर शेती करत असलेल्या या देशाचं नाव इस्त्राईल आहे. इस्त्राईल आणि अन्य अनेक देशांमध्ये शेती करण्यासारखी जमीन खूप कमी उपलब्ध आहे.
4 / 7
या समस्यांवर उपाय म्हणून या देशातील नागरिकांनी वर्टिकल फार्मिंगला सुरूवात केली आहे.
5 / 7
वर्टीकल फार्मिंगमध्ये रोपांना वेगवेगळ्या युनिट्समध्ये लावलं जातं. भीतींवरून रोपं खाली पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते.
6 / 7
वेगवेगळे भाग तयार करून एक किंवा एकापेक्षा जास्त रोपं लावली जातात.
7 / 7
इस्त्राइलशिवाय अमेरिका, युरोप, चीनमध्येही या पद्धतींचा वापर केला जात आहे. यामुळे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. ध्वनी प्रदूषणाचाही परिणाम कमी होतो.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFarmerशेतकरी