1 / 9जगभरात आधी राजेशाही व्यवस्था होती. पण नंतर ही व्यवस्था बदलली. पण आजही एक असा देश आहे जिथे पूर्णपणे राजेशाही सत्ता आहे. हा देश आहे स्वाजिलॅंड. येथील राजाने नुकतंच त्याच्या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनि ठेवलं आहे. हा देश आफ्रिका महाद्वीपाला लागून आहे. हा देश नुकताच एका अफवेमुळे चर्चेत आला होता.2 / 9खरंतर द गार्जियनसहीत अनेक वेबसाईट्सने लिहिले आहे की, येथील राजा मस्वति तृतीतने त्याच्या राज्यातील लोकांना संदेश दिला आहे की, जर त्याच्या राज्यातील कोणत्याही पुरूषाकडे पाचपेक्षा कमी पत्नी असतील तर त्यांना तुरूंगात टाकलं जाईल. पण राजाने नंतर ही बाब खोटी असल्याचं सांगितलं होतं3 / 9राजा मस्वति तृतीयने आतापर्यंत 15 लग्ने केली आहेत. सध्या त्याच्या 14 पत्नी आहेत. 15 पैकी एक पत्नी सेंतनी मसान्गोने गेल्यावर्षी कथितपणे आत्महत्या केली होती. मुळात इथे राजाची पत्नी निवडण्याचा रिवाज फारच विचित्र असतो.4 / 9या देशात दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या आसपास येथील राजा देशातील कुमारीकांची एक परेड ठेवतो. यात तरूणींना टॉपलेस ठेवलं जातं. यातील कोणत्याही तरूणीशी राजा लग्न करू शकतो.5 / 9गेल्यावर्षी देशातील तरूणींनी या प्रथेला विरोध केला होता. अनेक तरूणींनी परेडमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता. पण राजाला याबाबत माहिती मिळाल्यावर तरूणींच्या परिवारांना मोठा दंड भरावा लागला होता.6 / 9त्यासोबतच या देशाच्या राजावर सतत आरोप लागत असतात की, तो फारच विलासी आहे. तर देशातील मोठा वर्ग गरिब आहे.7 / 9पण सध्याचा वाद हा काही लोकांना तुरूंगात डांबण्याच्या आदेशावरून उठला आहे. पण नंतर राजाने ही एक अफवा असल्याचं सांगितलं. कारण या देशातील पुरूषाला पाच पत्नी करणं अशक्य आहे. कारण इथे गरिब लोकांची संख्या अधिक आहे.8 / 9स्वाजिलॅंडच्या राजाने त्याच्या 50 व्या वाढदिवसाला त्याच्या 15 पत्नींना रोल्स रॉयस सॅलून कार गिफ्ट केल्या होत्या. या सर्व कारची किंमत एकूण 175 कोटी रूपये इतकी होती. तसेच काही लक्झरी कार्स त्याने त्याच्यासाठीही खरेदी केल्या.9 / 9स्वाजिलॅंड हा एक गरिब देश आहे. पण येथील राजा विलासी, मजा करणारा असल्याने त्याच्यावर नेहमी टिकाही होते. या राजाकडे अनेक जेट प्लेन आणि एक पर्सनल एअरपोर्टही आहे.