२२५ वर्षाआधी राण्यांच्या आंघोळीसाठी बनवला होता हा महाल, पाचपैकी चार मजले पाण्याखाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:07 IST
1 / 8Jal Mahal: भारतातील अनेक ऐतिहासिक किल्ले आणि महालांची नेहमीच चर्चा होत असते. यात जयपूरच्या जल महालाची तर बातच वेगळी आहे. जल महाल आपल्या अलौकीक सौंदर्यासाठी ओळखला जातो. ३०० वर्षांआधी एका तलावात बांधलेला हा जल महाला आजही मोठ्या तोऱ्यात उभा आहे.2 / 8जल महाल हा जयपूर शान मानला जातो. जयपूर-आमेर मार्गावर मानसागर तलावाच्या मधोमध हा महाल बांधण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून पाण्यात उभा असलेला हा महाल जसाच्या तसाच आहे. पाण्यामुळे त्याचं काहीच नुकसान झालं नाही. साधारण २२६ वर्षाआधी बांधलेल्या या महालाकडे बघून सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की, हा बांधला कसा गेला असेल?3 / 8जल महाल सवाई जयसिंह यांनी १७९९ बांधला होता. महाल उभारण्याआधी जयसिंह यांनी जयपूरच्या गर्भावती नदीवर बांध बांधून मानसागर तलाव बनवला होता. मानसागर तलावाच्या मधोमध असलेल्या या महालाला 'आयबॉल' असंही म्हटलं जातं.4 / 8हा जल महाला बनवण्याचा उद्देशही खास होता. राजा आपल्या राणींसोबत इथे वेळ घालवत होते. तेच जयपूरचे एक ट्रॅव्हल रायटर लियाकत अली भट्टी हे सांगतात की, हा महाल राण्यांसाठी आंघोळ करण्यासाठी बनवला होता. या महालात राजा आपल्या राण्यांसोबत वेळ घालवत होते.5 / 8जल महाल पाच मजली आहे. ज्याचा चौथा मजला पाण्याच्या खाली आहे. जो दिसत नाही. केवळ एकच मजला पाण्याच्या वर दिसतो. त्यामुळेच या महालात गरमी होत नाही. रात्रीच्या वेळी या महालाचा नजारा काही औरच असतो. 6 / 8या तलावाच्या पाण्यात एक रहस्य दडलं आहे. महालाचे पाचपैकी चार मजले पाण्याखाली असतात. तरीही अजून याचं काही नुकसान झालं नाही. हा बांधला कसा गेला असेल याचं उत्तर कुणाकडेच नाही. लाल बलुआ दगडापासून तयार हा महाल आजही तसाच आहे.7 / 8महत्वाची बाब म्हणजे जल महालाच्या सगळ्यात वरच्या भागात नर्सरी आहे. ज्यात एक लाखांहू अधिक झाडं आहेत. या झाडांची देखरेख करण्यासाठी ४० माळी ठेवण्यात आले आहेत. 8 / 8तलाव ३०० एकर परिसरात आहे आणि ४ मीटर खोल आहे. तलावाच्या मधोमध असलेल्या या महालात जाण्याची परवानगी कुणालाही नाही. बाहेरून तुम्ही तो बघू शकता.