मिशा असलेल्या या राजकुमारीच्या मागे वेडे झाले होते तरूण, 13 जणांनी तर आत्महत्याही केली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 15:10 IST
1 / 9Princess of Persia Qajar: सुंदरतेला कोणतीही परिसीमा नसते. कुणाला कुणाची बाह्य सुंदरता मोहीत करते तर कुणाला कुणाची आंतरिक सुंदरता मोहीत करते. प्राचीन काळात मिशा असलेल्या राजकुमारी प्रेमात लोक इतके वेडे होते की, त्यातील १३ लोकांना आत्महत्याही केली होती.2 / 9मिशा असूनही ही राजकुमारी अनेक तरूणांची क्रश होती. या १३ तरूणांना जेव्हा तिच्याकडून प्रेम मिळालं नाही तेव्हा त्यांनी मृत्युला कवटाळलं. 3 / 9१९व्या शतकात लठ्ठपणाला सुंदरतेची पहिली पायरी मानलं जात होतं. ईराणची राजकुमारीच्या सुंदरतेचे किस्से आजही प्रसिद्ध आहे.4 / 9ईराणची राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाने तेव्हा सुंदरतेचे सर्व मापदंड मागे सोडले होते. तिला दाट मिशा होत्या आणि तिचे आयब्रोही फार दाट होते.5 / 9भलेही तिच्या चेहऱ्यावर मिशा होत्या, पण तरी सुद्धा ती तरूणांना फार सुंदर वाटत होती. ती फार लठ्ठही होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, लठ्ठ असूनही ती फार सुंदर दिसत होती.6 / 9असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. 7 / 9मात्र, राजकुमारीने सर्व तरूणांचे प्रस्ताव नाकारले. राजकुमारीच्या नकारामुळे १३ तरूणांनी आत्महत्या केली होती. तरूणांचे प्रस्ताव नाकारमागे कारण होतं. राजकुमारीचं लग्न आधीच अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेहसोबत झालं होतं.8 / 9राजकुमारीच्या अफेअरचे किस्सेही लोकप्रिय आहे. तिचे अनेक लोकांसोबत अफेअर होते. यात दोन प्रमुख लोक होते. एक म्हणजे अली खान अजीजी अल सुल्तान आणि दुसरा म्हणजे ईराणी कवि आरिफ काजविनी. 9 / 9राजकुमारी पाश्चिमात्य संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.