शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' राजाने दुश्मनांपासून वाचवण्यासाठी स्वत:च राणी शिर धडापासून केलं होतं वेगळं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:08 IST

1 / 9
भारतात वेगवेगळ्या राजांचे असे वेगवेगळे किल्ले आहेत जे इतिहासाची साक्ष देतात. हे किल्ले भारताची शान तर आहेतच सोबतच या किल्ल्यांमधील अनेक अशा रहस्यमय घटना आहेत ज्या वाचून आपण विचारात पडतो.
2 / 9
असाच एक किल्ला मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहे. याबाबत सांगितलं जातं की, इथे शासन करत असलेल्या राजाने स्वत: त्याच्या राणीचं शिर धडापासून वेगळं केलं. यामागची कहाणीही फारच हैराण करणारी आहे.
3 / 9
आम्ही तुम्हाला सांगतोय रायसेन किल्ल्याबाबत. १२०० ईसवीमध्ये हा किल्ला डोंगराच्या टोकावर तयार करण्यात आला होता. या किल्ल्यातील वास्तुकला फारच सुंदर आहे. आजही हा किल्ला मोठ्या थाटात उभा आहे. जसा आधी होता. बलुआ दगडापासून तयार या किल्ल्याला चारही बाजूने मोठ्या भींती आहेत. या किल्ल्याला ९ द्वार आणि १३ बुर्ज आहेत.
4 / 9
रायसेन फोर्टचा इतिहास मोठा राहिला आहे. इथे अनेक राजांनी राज्य केलं. ज्यातील एक शेरशाह सूरी हाही होता. पण किल्ला जिंकण्यासाठी त्याच्या नाकी नऊ आले होते. तारीखे शेरशाहीनुसार, चार महिन्यांच्या घेराबंदीनंतरही तो हा किल्ला जिंकू शकला नव्हता.
5 / 9
असं सांगितलं जातं की, शेरशाह सूरीने हा किल्ला जिंकण्यासाठी तांब्याची नाणी वितळवून त्याने तोफी तयार केल्या होत्या. ज्यामुळे त्याला विजय मिळाला होता. असंही सांगितलं जातं की, त्याला हा विजय फसवणूक करून मिळाला होता.
6 / 9
त्यावेळी किल्ल्यावर राजा पूरनमल यांचं शासन होतं. त्यांना जसं समजलं की, त्यांच्यासोबत दगा झाला आहे तेव्हा त्यांनी दुश्मनांपासून पत्नीला वाचवण्यासाठी तिचं शिर कापलं होतं.
7 / 9
त्यासोबतच या किल्ल्याबाबत आणखी एक रहस्यमय कहाणी आहे. असं म्हणतात की, येथील राजा राजनेसजवळ पारस दगड होता. ज्याने लोखंडाला सोनं करता येत होतं. या दगडासाठी अनेक युद्धे झाली. पण जेव्हा राजा राजसेन हरले तेव्हा त्यांनी हा पारस दगड किल्ल्यातील एका तलावात फेकला.
8 / 9
असे म्हटले जाते की, अनेक राजांनी हा किल्ला खोदून पारस दगड मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. आजही लोक इथे रात्री पारस दगड शोधण्यासाठी तांत्रिकांना घेऊन येतात. पण त्यांच्या हाती काही लागत नाही.
9 / 9
मात्र, पुरातत्व विभागाला याचा अजूनही काही पुरावा मिळाला नाही ज्यावरून हे समजेल की, पारस दगड किल्ल्यात आहे. पण ऐकीव गोष्टींवरून लोक लपून पारस दगडाच्या शोधात इथे येतात.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास