By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:14 IST
1 / 6संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) वर्षातून एकच सिनेमा करतात. पण चांगला सिनेमा करतात. त्यामुळेच त्यांचं नाव बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं. संजय लीला भंसाळी यांच्याबाबत आणखी बाब म्हणजे त्यांचा सिनेमा जेवढा सुंदर असतो तेवढेच वाद होतात. आता ते त्यांच्या नव्या 'हिरा मंडी' सिनेमामुळे चर्चेत आहे.2 / 6संजय लीला भंसाळी यांचा आगामी सिनेमा पाकिस्तानातील रेडलाइट एरिया 'हिरा मंडी'वर आधारित आहे. लाहोरच्या या रेडलाइट एरियाला शाही मोहल्ला असंही म्हटलं जातं. पाकिस्तान सिने विश्वात भंसाळी यांच्या या सिनेमाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, भारतीय निर्माते पाकिस्तानातील एका ठिकाणावर सिनेमा कसा बनवू शकतात. आता प्रश्न हा आहे की, हिरा मंडीमध्ये असं काय आहे की, इतका वाद होत आहे. (Image Credit : lauraagustin.com)3 / 6असं सांगितलं जातं की, हिरा मंडीचं नाव शिख महाराजा रणजीत सिंह यांचे मंत्री हिरा सिंह यांच्या नावावरून पडलं होतं. हिरा सिंहने इथे धान्याच्या बाजाराचं निर्माण केलं होतं. त्यानंतर हळूहळू त्यांनी या मंडीत तवायफांना आणलं. तेच महाराजा रणजीत सिंह यांनी नेहमीच या परिसराल संरक्षित करण्याचं काम केलं. या भागाला शाही मोहल्ला म्हणूनही ओळखलं जातं. कारण हा परिसर लाहोर किल्ल्याच्या बाजूलाच आहे.4 / 6मुघल काळादरम्यान अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान साख्या ठिकाणांहून महिलांना या मोहल्ल्यात आणलं जातं होतं. आजसारख्या त्यावेळी तवायफ बदनाम नव्हत्या. मुघलकाळात त्या संगीत, नृत्य, तहजीब आणि कलेशी जुळलेल्या होत्या. त्यांच्यामुळेच उच्च वर्गातील लोकांच्या मैफली सजायच्या. ज्यासाठी उच्च वर्गातून त्यांना इनाम दिले जायचे. काही काळाने शाही मोहल्ल्यात हिंद नहाद्वीप भागातील महिलाही येऊ लागल्या. त्या मुघलांसमोर क्लासिकल नृत्य करायच्या.5 / 6कालांतराने मुघलांच्या काळाची चमक फिकी पडली. परदेशी आक्रमणां दरम्यान शाही मोहल्ल्यात वसवलेले तवायफखाने तोडले गेले. त्यानंतर हळूहळू इथे वेश्यावृत्ती वाढली आणि आता तर इथे किन्नरांचे नृत्य बघितले जातात. 6 / 6दिवसा तर लाहोरचा हा भाग पूर्णपणे नॉर्मल मार्केट वाटतो. पण अंधार होताच हा भाग रेडलाइट एरिया बनतो. जर तुम्ही कलंक सिनेमा पाहिला असेल तर त्यातही शाही मोहल्ल्याचा उल्लेख आहे.