By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 16:48 IST
1 / 5तुम्ही आतापर्यंत अनेक हॉटेल्स पाहिली असतील. मात्र तुम्ही कधी विमानातलं हॉटेल पाहिलंय का? लुधियानात भारतातलं पहिलं एअरप्लेन रेस्टॉरंट सुरू झालंय. सध्या हे रेस्टॉरंट अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. 2 / 5आलिशाय डायनिंग टेबल्स आणि लज्जतदार पदार्थ मिळणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये एकाचवेळी 180 माणसं बसू शकतात. या रेस्टॉरंटची उभारणी दिल्लीमध्ये करण्यात आली. यानंतर या रेस्टॉरंटला 4 ट्रक्सच्या मदतीनं लुधियानाला आणण्यात आलं. या रेस्टॉरंटच्या उभारणीसाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला. 3 / 5परमजीत सिंह यांना महाराज एक्स्प्रेस पाहून एअरप्लेन रेस्टॉरंटची कल्पना सुचली. मग त्यांनी विमानात रेस्टॉरंटची उभारणी करण्यास सुरुवात केली. 4 / 5इतर रेस्टॉरंटपेक्षा अतिशय हटके असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये बेकरी, कॅफे आणि पार्टी हॉलदेखील आहे. 5 / 5या रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं. देशाच्या विविध भागांमध्ये मिळणाऱ्या शाकाहारी पदार्थांची चव इथं चाखता येते.