शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या रात्री चिप्स तळायला गेली भूक लागलेली मुलगी, सकाळी घर सोडून पळाले परिवारातील लोक...

By अमित इंगोले | Updated: October 3, 2020 13:30 IST

1 / 8
लॉकडाऊनपासून लोकांचं पूर्ण लाइफ बदललं आहे. रविवारसोबतच सगळेच दिवस सुट्टीसारखे आहेत. विद्यार्थ्यांबाबत सांगायचं तर त्यांचं झोपण्यापासून ते उठण्यापर्यंत सगळं रूटीन बिघडलं आहे. दिवसभर ते झोपतात आणि रात्री जागतात. अशात अर्ध्या रात्री अनेकांना भूक लागते. सिडनीतील एका परिवारातील मुलीला अशीच अर्ध्या रात्री भूक लागली आणि तिची ही अर्ध्या रात्रीची भूक परिवाराला चांगलीच महागात पडली. या मुलीला रात्री भूक लागली तर ती स्वत: चिप्स तळू लागली होती. पण या फटका पूर्ण घराला बसला. १५ वर्षांच्या मुलीने चिप्स तळण्याच्या नादात पूर्ण घर बेचिराख करून टाकलं.
2 / 8
ही घटना आहे २९ सप्टेंबरची. इथे एका घरात मोठी आग लागली. ५५ वर्षीय लिंडा बर्रेट नावाच्या महिलेला तीन मुली आणि कुत्र्याला घेऊन घर सोडावं लागलं.
3 / 8
कारण अर्ध्या रात्री महिलेच्या घरात आग लागली. याचं कारण ठरली या महिलेची १५ वर्षाची मुलगी. लॉकडाऊनमध्ये घरात राहत असताना तिला अर्ध्या रात्री भूक लागली होती.
4 / 8
१५ वर्षांच्या मुलीने अर्ध्या रात्री चिप्स तळण्याचा नादात पूर्ण घरच जाळलं. रात्री तिला भूक लागली तर तिने कुणालाही न उठवता स्वत:च चिप्स तळायला सुरूवात केली होती.
5 / 8
या मुलीने कढईत तेल गरम केलं आणि त्यात चिप्स टाकताच तेल जास्त गरम झाल्याने आग पेटली. ही आग किचनमधून डायनिंग रूम, लॉाउन्ज आणि पायऱ्यांपर्यंत पोहोचली.
6 / 8
घरात सगळीकडे धुराचे लोळ पसरले होते. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या १५ जवानांना तीन तास लागले.
7 / 8
महिला अर्ध्या रात्री तिच्या १३, १५ आणि १८ वर्षाच्या मुलींना घेऊन घरातून वेळीच बाहेर पडली. आईने या घटनेसाठी मुलीला माफही केले.
8 / 8
महिलेने टेलिग्राफला सांगितले की, या घटनेनंतर मुलगी शॉकमध्ये आहे. या आगीमुळे महिलेला २ कोटी ५६ लाख रूपयांचं नुकसान झालं आहे. आलु चिप्समुळे झालेल्या या नुकसानाची सध्या चर्चा होत आहे. महिलेने सांगितले की, जळालेलं घर रिपेअर झाल्यावर ती पुन्हा परिवारासोबत तिथे शिफ्ट होईल.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाfireआगInternationalआंतरराष्ट्रीय