शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किती वर्ष असतं सगळ्यात विशाल प्राणी हत्तींचं आयुष्य? वर्ष वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:20 IST

1 / 7
हत्ती आपल्या प्रचंड आकारामुळे, बुद्धिमत्तेमुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जातात. शतकानुशतके ते मानव सभ्यतेचा एक भाग राहिले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या विशाल आणि अद्भुत प्राण्यांचे आयुष्य नक्की किती असते? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की हत्ती किती वर्षे जगू शकतात? चला, जाणून घेऊ या हत्तींच्या दीर्घायुष्याबद्दल आणि त्याच्याशी निगडित काही रंजक गोष्टी.
2 / 7
मीडिया रिपोर्टनुसार, सामान्यपणे हत्ती ५० ते ७० वर्षापर्यंत जीवंत राहतात. काही केसेसमध्ये हत्ती ८० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ जगतात. हत्तींचं आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ज्यात प्रजाती, ठिकाण, आरोग्य आणि देखरेख यांचा समावेश आहे.
3 / 7
हत्ती हे फारच सामाजिक प्राणी असतात. ते परिवारात राहतात आणि एकमेकांची काळजी घेतात. ही सामाजिक संरचना त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी मदत करते.
4 / 7
हत्तींची वाढ हळूहळू होते. ते परिपक्व होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. ही त्यांची हळुवार होणारी वाढ त्यांचं आयुष्य वाढवण्यास मदत करते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये हत्तींचं वय आणि त्यांच्या संरक्षणाबाबत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत.
5 / 7
वैज्ञानिकांना असं आढळलं आहे की, वय वाढण्यासोबतच हत्तींना आरोग्यासंबंधी काही समस्यांचा देखील सामना करावा लागतो. जसे की, संधिवात, कॅन्सर आणि हृदयरोग.
6 / 7
तसेच अनेक संस्था अनाथ हत्तीची देखरेख करतात आणि त्यांचं पुर्नवसन करण्याचं काम करतात. या संस्थामुळे अनेक हत्तींनी नवीन जीवन मिळालं आहे.
7 / 7
सोबतच हत्ती शिकार आणि जंगलतोड यामुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक देशांनी हत्तींच्या संरक्षणासाठी कठोर कायदेही तयार केले आहेत.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके