hop shoots most expensive vegetables in the world cost 1 lakh rupees per kilogram hop shoot price
बापरे! एक लाख रुपये किलोपर्यंत विकली जाते 'ही' भाजी; जाणून घ्या का आहे खास? By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:51 PM1 / 6एक किलो भाजीची किंमत जवळपास 85 हजार रुपये आहे.... हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? तर होय... द गार्डियनच्या वृत्तानुसार, हॉप शूट्सच्या वनस्पतीपासून मिळणारी भाजी 85 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलो दराने विकली जाते. हॉप शूट्सच्या फुलांचा वापर मादक द्रव्य बनवण्यासाठी केला जातो.2 / 6उत्तर अमेरिका, युरेशिया आणि दक्षिण अमेरिकेत हॉप्सचे पीक घेतले जाते. उष्णकटिबंधीय हवामानासाठी योग्य, ही वनस्पती भारतात लागवड करता येत नाही. मात्र, भारतात काही शेतकऱ्यांनी या भाजीपाल्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.3 / 6हॉप शूट्सची वनस्पती औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानली जाते. चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, उत्साह, अटेंशन डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड यांवरही या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. यासोबतच ही भाजी कॅन्सरशी लढण्यासही सक्षम आहे.4 / 6हॉप शूटमध्ये शंकूच्या आकाराची फुले येतात. त्यात स्ट्रोबाइल असते. याचा वापर बिअरच्या गोडव्याला संतुलित करण्यासाठी केला जातो. हॉप शूट्सच्या वनस्पती ओळींमध्ये वाढत नाहीत. त्यांची कापणी करण्यासाठी काही मेहनत करावी लागते.5 / 6'हॉप शूट्स'ही कच्चे खाल्ले जातात. मात्र, त्याची चव कडू असते. त्यापासून लोणचेही बनवले जाते. द गार्डियनच्या वृत्तानुसार, एवढी महाग भाजी असतानाही ब्रिटनसह अनेक देशांमध्ये ती टाकाऊ म्हणून गणली जाते.6 / 6या वनस्पतीची भाजी तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात. वनस्पतीमध्ये लहान, नाजूक हिरवे सिरे असतात. ते काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याची काळजी घेणे खूप मेहनतीचे काम आहे. यामुळेच हॉप शूट्सच्या भाजीची किंमत खूप जास्त आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications